आंबेत पुलाला पर्यायी नवीन पुलाचे बांधकामास मंजुरीसाठी शासनदरबारी माझे प्रयत्न असतील - पालकमंत्री आदिती तटकरे - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, June 27, 2021

आंबेत पुलाला पर्यायी नवीन पुलाचे बांधकामास मंजुरीसाठी शासनदरबारी माझे प्रयत्न असतील - पालकमंत्री आदिती तटकरे

 आंबेत पुलाला पर्यायी नवीन पुलाचे बांधकामास मंजुरीसाठी शासनदरबारी माझे प्रयत्न असतील - पालकमंत्री आदिती तटकरे 

 अरुण जंगम-म्हसळाआंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम पुर्ण होऊन ते रहदारीसाठी खुले करण्यात आले असले तरीही हा पुल दोन जिल्ह्यांना जोडणारा मुख्य रहदारीचा मार्ग आहे.या पुलाला पर्यायी नवीन पुल वेळीच बांधणे गरजेचे आहे.पुलाचे बांधकामाचा आराखडा बांधकाम विभागाकडे तयार आसुन नवीन पुलाचे बांधकामासाठी आघाडी सरकारने लवकरच मंजुरी दयावी अशी आपली मागणी आसुन मंजुरी मिळणे कामी मंत्री म्हणून आपले प्रयत्न असणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आंबेत पुल नुतनीकरण बांधकाम उद्घाटन कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्य करून दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार असलेला सावित्री नदीवरील आंबेत पुलाची नव्याने 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून डागडुजीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले असल्याने पुलावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी सातत्याने स्थानिक पातळीवर ग्रामस्थांमार्फत करण्यात येत होती त्याची दखल घेऊन पाचच दिवसापूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आंबेत पुलाची पहाणी केली होती.दोन जिल्ह्यांना जोडणारा एकमेव कमी अंतराचा रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने तो लवकरच सुरू करणे गरजेचे होते.जनतेची तशी मागणीही होत होती त्यामुळे 

पुलाचे नुतनीकरण करण्याचे काम पुर्ण होताच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उदघाटन कार्यक्रम करून आंबेत पुल प्रवासी वाहतुकीस खुला करण्यात आला.दिनांक 26 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल घेऊन आणि नवीन बांधकामाबाबत अन्य सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर लागलीच उद्घाटन कार्यक्रम करण्यात आल.कोकणातील मुख्यतः मंडणगड,दापोली,खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा मार्ग ओळखला जातो.आंबेत पुल नूतनीकरण बांधकाम उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे यांचे समावेत दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,रत्नागिरी जि.प.माजी सदस्य अजय बिरवाटकर,म्हसळा पं.स.सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर,मंदनगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम,प्रांताधिकारी अमित शेटगे,नायब तहसिलदार के.टी. भिंगारे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.बामणे,अधीक्षक अभियंता रा.मो.गोसावी,श्री राऊत,सनरचना कंपनीचे मॅनेजर जोशी,सामाजिक कार्यकर्ते नाविदभाई अंतुले,पाभरे सरपंच अनिल बसवत,संदेरी सरपंच फारुख हजवाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल कमी अंतराचा,पर्यटनाच्या आणि अवजड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने भविष्यात नवीन पुलाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुलाचे उदघाटन कार्यक्रमावेळी दिली आहे.या वेळी त्यांनी कोरोना प्रादुर्भाव बाबतीत नागरिकांनी सतर्कता बाळगुन नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.  नव्याने डेल्टा + कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची लाट राज्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची सुरवातही झाली असल्याने अनावश्यक गर्दी टाळावी आणि शासनाचे नियमांचे पालन करावे असे आवर्जुन सांगितले.येणाऱ्या काळात कोरोनाला आळा घालण्यासाठी  शासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे असे पालकमंत्री यांनी आवर्जुन सांगितले.

No comments:

Post a Comment