Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बोंडारवाडी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा आ . शिवेंद्रसिंहराजे ;

 बोंडारवाडी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा आ . शिवेंद्रसिंहराजे 

  • अधिकारी व ग्रामस्थ बैठकीत प्रशासनाला केल्या सूचना 

प्रतीक मिसाळ सातारा

जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे . या प्रकल्पला पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे . त्यामुळे ठो - राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे सकारात्मक अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावाआणि हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी , अशा सूचना आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या . जावली तालुक्यात बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे . आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या दालनात आज महत्वपूर्ण बैठक झाली . या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी रामदास शिंदे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती चौगुले , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे , यांच्यासह मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार , बबनराव बेलोशे , शाम धनावडे , अंकुश बेलोशे , ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बोंडारवाडी धरण निर्माण समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते . जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत . त्याला अनुसरून आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी आज जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेतली . तीनही विभागांनी तातडीने सकारात्मक अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies