महाराष्ट्र मिरर ब्रेकिंग
साताऱ्यात पावसाचा जोर कायम, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
कुलदीप मोहिते -कराड
राज्यात हवामान खात्याने तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाण्याची आवक सुरू असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे धरणातून आता प्रति सेकंद 41 हजार क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक सुरू झालेली आहे त्यामुळे आता कोयना धरण वीज पायथा ग्रह आतून 2100 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे असे कोयना धरण व्यवस्थापन ना कडून सांगण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे