Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी सतर्क राहिले पाहिजे- आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले

 कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी सतर्क राहिले पाहिजे- आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • बामणोली येथील कोरोना केअर सेंटर तर आपटी येथील विलगिकरण कक्षाचे उदघाटन 

प्रतीक मिसाळ सातारा



 


सातारा- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील राहून चालणार नाही . आपले गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे आणि ते कायम कोरोनामुक्त राहिले पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत . आपले गाव आणि भागाच्या कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी कायम सतर्क राहावे , असे आवाहन आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले . आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रत्नातून आणि त्यांच्या आमदार फंडातून बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त कोरोना केअर सेंटर व आपटी आरोग्य उपकेंद्र येथील कोरोना विलगिकरण कक्षाचे आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . यावेळी ते बोलत होते . यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे , तहसीलदार राजेंद्र पोळ , गट विकास अधिकारी सतीश बुद्धे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान मोहिते , डॉ.ज्ञानेश्वर मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती . सर्वत्र कोरोनाने हाहाकार केलेला असताना ठीक ठिकाणी ऑक्सिजन बेड कमी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत होती . हे लक्षात घेऊन आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली या ठिकाणी आमदार फंडातून दहा बेडचे सुसज्ज असे ऑक्सिजनयुक्त कोरोना सेंटर सुरू केले . तसेच नवतरुण ग्रामविकास मंडळ मुंबई , आपटी व बजरंग सपकाळ यांच्या अर्थसहाय्यातून आपटी या ठिकाणी उभारण्यात आलेले वीस बेडचे विलगिकरण कक्ष या दुर्गम भागातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे . दुर्गम व डोंगराळ बामणोली भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन बामणोली आरोग्य केंद्राला कोरोना केअर सेंटर सुरू केले असून , सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे . या भागातील लोकांच्या आरोग्यासह इतरही सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून , आपटी आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आ . शिवेंद्रसिंहराजे म्हणाले . बामणोली येथील दहा बेड व आपटी येथे वीस बेड असल्याने यापुढील काळात या भागातील लोकांना आता मेढा किंवा सातारा या ठिकाणी जाऊन बेड शोधत बसण्याची वेळ येणार नाही . तरी देखील भागातील सर्व ग्रामस्थांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत व प्रशासनास सहकार्य करावे आणि कोरोनाला दूरच रोखवे असे देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले . यावेळी समाजसेवक ज्ञानदेव रांजणे , राम पवार , यशवंत आगुंडे , सदाभाऊ शिंदकर , राजेंद्र संकपाळ , बामणोलीच्या सरपंच जयश्री गोरे आर .डी.भोसले , प्रकाश शंकर सुतार , बामणोली भागातील विविध गावांचे सरपंच , सदस्य पोलीस पाटील , ग्रामसेवक , सर्कल , तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies