कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात २२० मिलिमीटर इतका पाऊस - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, June 17, 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात २२० मिलिमीटर इतका पाऊस

 कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी  धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात २२० मिलिमीटर इतका पाऊस

निरंजन पाटील -राधानगरी राधानगरी तालुक्यात पावसाने धुवांधार सुरवात केलीय,

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात तब्बल  २२० मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस झालाय, त्यामुळे तालुक्यातील ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागलेत, डोंगर दऱ्यांचं मनमोहक रूप वर्षा पर्यटकांना खुणावू लागलंय परंतु कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटकांना बंदी असल्याने पर्यटकांना हा आनंद लुटता येणार नाही.

    

 राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल  २२० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.धरणाचा पाणीसाठा अठ्ठावीस टक्के इतका झालाय, धरणातून ८४१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलाय,पावसाचा जोर असाच राहील्यास कसबा तारळे इथला जुना बंधारा आणि शिरगाव पूल पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  

No comments:

Post a Comment