कर्जत नगरपालिकेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भुमीपूजन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

कर्जत नगरपालिकेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भुमीपूजन

 कर्जत नगरपालिकेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भुमीपूजन

  • नगरपालिकेच्या फंडातून 3 लाख 50 हजार 146 रुपये खर्च

ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम                कर्जत नगरपरिषद हद्दीत विविध कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. नगरपरिषद हद्दीतील मुद्रे येथे समीर चव्हाण यांचे निवासस्थान ते मुख्य रस्त्यापर्यंतचे गटार नगरपरिषद फंडातून 48 हजार 317 रुपये खर्च करून दुरुस्त करणे, मुद्रे आदिवासी वाडी येथील जाधव यांचे निवासस्थान ते पळसकर यांच्या निवासस्थाना पर्यत नगरपरिषद फंडातून 1 लाख 68 हजार 641 रुपये खर्च करून रस्ता कॉक्रीटीकरण करणे, आणि मुद्रे गुरू नगर ते स्वप्ननगरी पर्यतच्या रस्त्याची नगरपरिषद फंडातून 1 लाख 33 हजार 188 रुपये खर्च करून साईडपट्टीचे भरणे अश्या तीन कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, स्थानिक नगरसेविका भारती पालकर, नगर अभियंता मनिष गायकवाड, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रचना सहाय्यक लक्ष्मण माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment