Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त- भाजप लोणी काळभोर व कदमवाकवस्ती यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

 डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त- भाजप लोणी काळभोर व कदमवाकवस्ती यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

 प्रियांका ढम - पुणे


भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर कदम वाक वस्ती शहर यांच्या वतीने, पालखी स्थळ सभागृह, कदम वाक वस्ती या ठिकाणी करण्यात आले होते.

खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले

१) जय हिंद ग्रुप- दिनेश भाटी, करण पवार, निखिल बाबा लोहारकर व त्यांच्या सहकार्यांनी पालखी स्थळ येथील जागेमध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम करून संपूर्ण पालखी स्थळाचा कायापलट केला आहे. पूर्वी या जागेमध्ये घाणीचे साम्राज्य होते व त्या ठिकाणाहून प्रवास करणेही किळसवाणे होते. परंतु आता प्रशस्त खेळाचे मैदान व भरपूर वृक्षारोपण झाले आहे.

२) सहजीवन प्राणिमित्र फाउंडेशन - कुमारी अनुराधा कदम व तिच्या सहकाऱ्यांनी ही संस्था सुरू केली. ही संस्था भटकी कुत्री यांची देख भाल आजारपण व त्यांची नसबंदी करणे, आदी कार्यक्रम स्वखर्चाने राबवतात. भविष्यात पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी मोठे काम उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

३) श्री नितीन कोलते- यांनी लोणी काळभोर टोल नाका ते हडपसर या महामार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या डीवाईडर मध्ये शासनाची विशेष परवानगी घेऊन अनेक अडचणींना सामोरे जात वृक्षारोपण व संवर्धन केले. या रस्ता दरम्यान प्रवास करताना येथील मोठी झालेली सुशोभित झाडे याची साक्ष देतात.

४) श्री बाळासाहेब मुरलीधर गायकवाड- आशिया खंडातील सर्वात मोठ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल. अतिशय सामान्य पदावरून सुरू केलेला त्यांचा प्रवास उपसचिव या पदापर्यंत पोहोचला आहे. 

५) सौ श्वेता कमलेश काळभोर -  त्या क्रेयॉन्स प्री स्कूलच्या डायरेक्टर व के फिट वेलनेस सेंटरच्या प्रोप्रायटर आहेत. लग्नानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी त्यांचे Law चे शिक्षण पूर्ण करत नुकतीच BALLB ही डिग्री प्राप्त केली. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

६) *आदर पूनावाला* यांच्या स्वच्छता करणाऱ्या गाड्यांवरती कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


वरील मान्यवरांचा सत्कार पत्रकार धनराज साळुंखे, पत्रकार राम भंडारी, पत्रकार विजय रणदिवे व पत्रकार दिगंबर जोगदंड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


सत्कार समारंभानंतर कुमार मल्हार पांडे यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकणारे व्याख्यान दिले.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन, मान्यवरांच्या स्वागताने झाली.


कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य श्री अनिल जी टिळेकर व प्रमुख पाहुणे म्हणून नंदू काका काळभोर, श्री गणेश शेठ कोतवाल, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसो काळभोर हे उपस्थित होते. भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नाना काळभोर यांनी प्रास्ताविक केले. भाजपा लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी सूत्रसंचालन केले.भाजपा शहराध्यक्ष कदमवाक वस्ती विशाल गुजर यांनी आभार मानले. 

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे हवेली तालुका अध्यक्ष नितीन जी टिळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्रजी हाजगुडे, विशाल जी वेदपाठक, संदीप जी गुप्ता, महिला पदाधिकारी सविता वर्मा, नीलम गव्हाणे, विजय शिंदे, दशत कोटियाल, आदी  अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण वंदे मातरम ने झाली....🙏

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies