Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

Benelli 502C: भारतात लाँच झाली पॉवरफुल क्रूजर बाइक; १०,००० रुपयांत बुकिंग सूरू

 Benelli 502C: भारतात लाँच झाली पॉवरफुल क्रूजर बाइक; १०,००० रुपयांत बुकिंग सूरू

 ज्ञान -तंत्रज्ञान
अनुप ढम

इटलीची प्रमुख ऑटो कंपनी बेनेलीने (Benelli) भारतात आपली 502C क्रूजर बाइक ( Benelli 502-C) आज लाँच केली. ४.९८ लाख रुपये इतक्या एक्स-शोरुम किंमतीत बेनेलीने ही दमदार क्रूजर बाइक भारतात उतरवली आहे. किंमतीच्या बाबतीत ही क्रूजर बाइक Leonino पेक्षा जवळपास ३० हजार रुपयांनी महाग आहे, या किंमतीवर Benelli 502-C ची थेट टक्कर कावासाकीच्या Vulcan S सोबत होईल.

नवीन Benelli 502C एक स्पोर्टी स्टाइल असलेली क्रूजर बाइक असून यामध्ये LED लायटिंग पॅकेज, फ्री-फ्लोटिंग सीट, ड्युअल बॅरेल एग्जॉस्ट सेटअप आणि चंकी फ्रंट सस्पेन्शन आहे. कंपनीची ही बाइक भारतात दोन - मॅट ब्लॅक आणि मॅट कॉग्नॅक रेड या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

नवीन Benelli 502-सी क्रूजर बाइकमध्ये ५००सीसी क्षमतेचे पॅरेलल ट्विन-सिलेंडर इंजिन दिले आहे. इंजिनसोबत ६-स्पीड गिअरबॉक्स असून हे इंजिन ८५०० आरपीएमवर ४७.५ बीएचपी पॉवर आणि ६००० आरपीएमवर ४६ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. तर, बाइकचा ग्राउंड क्लीअरन्स १७० mm इतका आहे.

Benelli 502-सी क्रूजर बाइकच्या फ्रंटमध्ये अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणिम मागे मोनो-शॉक सस्पेंशन आहे. या बाइकमध्ये कंपनीने डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल, बॅक रायडिंग एर्गोनॉमिक्स, २१-लिटर पेट्रोल टाकी आणि अॅड्जस्टेबल क्लच दिलेत. Benelli 502C च्या पुढे २८० mm ड्युअल डिस्क आणि मागे २४० mm सिंगल डिस्क आहे. बाइकमध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून ड्युअल चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) आहे. यातील इंस्ट्रुमेंट क्लस्टर ट्रिप मीटर, ऑडोमीटर, स्पीड, गिअर इंडिकेटर, फ्युअल गेज आणि आरपीएम अशी सर्व माहिती देतं. कंपनीने यापूर्वीच Benelli 502-C साठी १० हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि डीलरशिप्समध्ये ८ जुलैपासून प्री-बुकिंगला सुरूवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies