रियलमीचे हे ५ नवीन प्रोडक्ट्स आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स
ज्ञान तंत्रज्ञान
अनुप ढम
Realme Watch 2 Pro आणि Realme Watch 2 स्मार्टवॉचला आज २३ जुलै रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. या वॉच सोबत Realme Buds Wireless 2 Neo, Realme Buds Q2 Neo आणि Realme Buds Wireless 2 सारखे ऑडियो प्रोडक्ट्स सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इव्हेंटची सुरुवात १२.३० वाजता सुरू होणार आहे. या इव्हेंट मध्ये वियरेबल आणि ऑडियो कॅटेगरी मध्ये वर सांगितलेले ५ प्रोडक्ट्स लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटची लाइव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवरून पाहता येवू शकते.
Realme Watch 2 Pro च्या फीचर्स मध्ये १.७५ इंचाचा कलर डिस्प्ले, १४ दिवस पर्यंत बॅटरी लाइफ, ९० स्पोर्ट्स मोड्स, 24X7 हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, नोटिफिकेशन्स अलर्ट, अलार्म, रिमाइंडर्स आणि IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट सारखे फीचर्स दिले आहेत. याच प्रमाणे Realme Watch 2 मध्ये १.४ इंचाचा डिस्प्ले, ९० स्पोर्ट्स मोड्स, १२ दिवस पर्यंत बॅटरी लाइफ, IP68 डस्ट एंड वाटर रेसिस्टेंस, SpO2 मॉनिटर, स्लीप मॉनिटर, हाइड्रेशन रिमाइंडर आणि कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील
Realme Buds Wireless 2 Neo मध्ये 11.2mm बेस बूस्ट ड्राइवर्स, १७ तासांपर्यंत बॅटरी लाइफ, USB टाइप सी चार्जिंग पोर्ट, एनवायरमेंटल नॉयज कॅन्सिलेशन, IPX4 सर्टिफिकेशन आणि 88ms सुपर लो लॅटेंसी सारखे फीचर्स दिले जाणार आहेत. Realme Buds Wireless 2 च्या फीचर्स मध्ये 13.6mm बेस बूस्ट ड्राइवर्स, कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ v5, LDAC Hi-Res, AAC आणि SBC ऑडियो कोडेकचा सपोर्ट, ANC आणि कॉल्ससाठी Vocplus AI नॉयज कॅन्सिलेशन आणि 88ms लो लेटेंसी सारखे फीचर्स पाहायला मिळतील. Realme Buds Wireless 2 Neo मध्ये २० तासांची बॅटरी आणि १० एमएम ड्रायव्हर्स सारखे फीचर्स पाहायला मिळतील.