पूरग्रस्त भागाला आमदार महेंद्र थोरवे यांची भेट,तात्काळ मदत देण्याचे तहसीलदार यांना दिले निर्देश
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम
https://youtu.be/VsQd7FpZSfw
गुरुवार शुक्रवार पर्यंत पावसाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढलं,त्याचबरोबर कर्जत तालुक्यालाही या पुराच्या पाण्याने जोरदार फटका बसला त्या पूरग्रस्त भागातील कुशीवली, कोलीवली, चांधई,वदप,दहीवली,मोहिली आदी भागात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे.ज्या घरात पुराचे पाणी शिरून मोठया प्रमाणात नुकसान झाले त्याचे त्वरित पंचनामे करून आपतग्रस्तांना तात्काळ भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी कर्जतचे तहसीलदार यांना दिले आहेत.तसेच मोहिली आणि दहीवली पुलाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असून हे पुलही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त करावेत असे निर्देश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.
यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,कर्जत नगरपालिका नगरसेवक संकेत भासे, पंकज पाटील आणि युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.