मोटोरोला करणार धडाक्यात एंट्री, लाँच करणार ‘हे’ तीन शानदार स्मार्टफोन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, July 3, 2021

मोटोरोला करणार धडाक्यात एंट्री, लाँच करणार ‘हे’ तीन शानदार स्मार्टफोन

 मोटोरोला करणार धडाक्यात एंट्री, लाँच करणार ‘हे’ तीन शानदार स्मार्टफोन

                ज्ञान -तंत्रज्ञान

                   अनुप ढम


मोटोरोला लवकरच Motorola Edge+ स्मार्टफोन सोबत फ्लॅगशिप मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या मिड-रेंज Motorola Edge हँडसेटची घोषणा केली आहे. यावर्षी कंपनीने चीनमध्ये Motorola Edge S स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनला जागतिक बाजारात Moto G100 नावाने सादर करण्यात आले आहेत. आता रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, कंपनी नवीन एड्ज सीरिजच्या स्मार्टफोन्सवर काम करत आहे

गेल्या आठवड्यात टिप्स्टर इवान ब्लासने Edge 20 मॉडेल्सच्या स्पेसिफिकेशनबाबत खुलासा केला होता. आता टिप्स्टरने एक ट्विट करत सीरिजच्या फोन्सच्या नावांचा खुलासा केला आहे.
याआधी समोर आलेल्या लीकमध्ये समोर आले होते की, नवीन Edge मॉडेल्सचे कोडनेम Berlin/Berlin NA, Kyoto आणि Pstar (Sierra) असू शकता. आता ब्लासने खुलासा केला आहे की, या फोन्सला बाजारात Edge 20, Edge 20 Lite आणि Edge 20 Pro नावाने उपलब्ध केले जाईल. हे फोन्स या महिन्याच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे

No comments:

Post a Comment