Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांची साताऱ्यात जोरदार घोषणाबाजी

 इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांची साताऱ्यात जोरदार घोषणाबाजी 

प्रतीक मिसाळ -सातारा

पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती व घरगुती गॅसची झालेली दरवाढ या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने साताऱ्यात धरणे आंदोलन केले . केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली . राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व युवा मोर्चाचे तेजस शिंदे , राष्ट्रवादी पक्षाचे सचिव राजकुमार पाटील यांच्यासह आंदोलकांनी वाढत्या महागाईच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधले . मोदी सरकार हाय हाय , पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा , अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला . काही आंदोलक थेट क्रिकेटपटूच्या वेषभूषेत या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते . सुरक्षेच्या कारणातव आंदोलक पोवई नाक्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले . 

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना सुनील माने व तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महागाईच्या निषेधाचे निवेदन सादर केले . या निवेदनात नमूद आहे की पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ यामुळे जनता महागाईने त्रस्त झाली आहे . केंद्र सरकारचे भाववाढीचे गणित सर्वसामान्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे असून केंद्र शासनाविषयी प्रचंड असंतोष आहे . केंद्रशासनाचे गॅस दरवाढीवर सुध्दा कोणतेही नियंत्रण नाही . ही इंधन दरवाढ तत्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे . या निवेदनाद्वार राजेंद्र लावघरे , संगीता साळुखे , सागर कांबळे , निवास शिंदे , पूजा काळे , गोरखनाथ नलावडे , व शफीक शिंदे यांच्या सह्या आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies