Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाविकास आघाडीतील प्रत्त्येक घटक पक्षाला स्वतःची पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

 महाविकास आघाडीतील प्रत्त्येक घटक पक्षाला स्वतःची पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

आदित्य दळवी / ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम


महाविकास आघाडीतील प्रत्त्येक घटक पक्षाला स्वतःची पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे तसा शिवसेना पक्ष वाढीसाठी मुख्यमंत्री त्या अधिकारानुसार शिवसंपर्क  अभिनयान राबवित आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला बरंच काही दिलं परंतु आपण शिवसैनिक पक्षासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे अस प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज  शिवसंपर्क अभियानात कर्जत येते बोलत होते. 

भविष्यकाळात मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या नात्याने आपल्याला या मतदार संघात कोणतेही नवीन कॉलेज काढायचे असेल तर सर्वतोपरी परवानगीकरीता मदत करेन असे आश्वासन  त्यांनी यावेळी दिले...

यावेळी व्यासपीठावर असलेले आमदार महेंद्र थोरवे यांचे कौतुक करताना मंत्री सामंत म्हणाले,"आमदार महेंद्र थोरवे यांनी  फार कमी कालावधीत  विकास कामे केली आहेत"

यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर मधील मंजूर केलेल्या विकास कामांची आठवण पुन्हा एकदा करून दिली. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहेत ते  काम घराघरात पोहचविणे हे आपल्या सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे आणि  आपल्याला त्याचा सर्वस्वी अभिमान आहे असे आमदार थोरवे म्हणाले.

या संपर्क अभियाना अंतर्गत सुनील भालीवडे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य,विलास श्रीखंडे-रायगड जिल्हा सहसंयोजक, मंगेश काळोखे भाजपा कार्यकर्ते ,मच्छिंद्र पादिर- भाजप कार्यकर्ते,शिंगोले- भाजप कलंब जि प विभाग प्रमुख या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला...

यावेळी रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील,उपजिल्हाप्रमुख भाई गायकर ,महिला जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे , सल्लागार भरत भाई भगत विधानसभा संघटक संतोष शेठ भोईर , जिल्हा नियोजन  समिती सदस्य नवीन दादा घाटवळ, कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे, उपजिल्हा आधिकरी प्रशांत खांडेकर तालुका युवा सेना अधिकारी अमर मिसाळ खालापूर तालुका युवा सेना अधिकारी महेश पाटील,खोपोली कर्जत मधील सर्व उपतालुका प्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies