Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी : आ.महेश शिंदे

 डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी : आ.महेश शिंदे

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने बुधमध्ये वृक्षारोपण ! तीनशे झाडांचे वृक्षारोपण 

प्रतीक मिसाळ -कोरेगाव


तीर्थरूप डॉ . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा ता . अलिबाग यांच्यावतीने महाराष्ट्रभुषण डॉ . नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी करंजओढा ( बुध ता.खटाव ) येथे वृक्षारोपण संपन्न झाले . वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत आलेले असुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे . समर्थ बैठकीच्या माध्यमातुन उत्तम संस्कार मिळत असल्याचे प्रतिपादन कोरेगाव - खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी केले . वृक्षारोपणप्रसंगी अविनाश फडतरे ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ) , अभयसिंहराजे घाटगे ( बुध सरपंच ) , मानाजी घाडगे ( माजी जि.प.सदस्य ) , जयवंत गोसावी ( ललगुण - सरपंच ) , तानाजी फाळके ( शिंदेवाडीसरपंच ) , सुनिल फाळके ( उपसरपंच शिंदेवाडी ) डॉ . सुरेश जाधव ( काँग्रेस जिल्हाध्यक्ष ) , प्रकाश यादव ( सहाय्यक पोलिस निरीक्षक ) , राजेंद्र कचरे ( मार्केट कमिटी संचालक ) डॉ . घाडगे , गणेश सातपुते उपस्थित होते . 

मानवाला जगण्यासाठी प्राणवायुचे उत्सर्जन ; अन्न , वस्त्र , निवारा , औषध , मुलभुत गरजांची उपलब्धता ; पावसाला पृथ्वीकडे आकर्षित करण्याचे कार्य वृक्षच करतात . वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम , ऋतुचक्रावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नदयांना अचानक महापुर तसेच औष्णिक स्तर वाढू लागल्याने वृक्षारोपन , वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे . यामुळे स्वयंस्फुर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातुन होत असुन समाजासमोर आदर्श उभा केला आहे . वृक्षारोपन करून विश्वसेवा , राष्ट्रसेवा , मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातुन आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्वाची आहे . वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्वपुर्ण आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातुन जिल्ह्यात हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपुर्वक केले जात असुन या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग आहे .

आप्पासाहेब धर्माधिकारी , सचिनदादा धर्माधिकारी , उमेशदादा धर्माधिकारी , राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सदस्यांनी विविधप्रकारची फळझाडे , औषधी झाडे लावून संरक्षणासाठी प्रतिष्ठानद्वारे सभोवताली बांबुचे बॅरिगेटस , कुंपन करण्यात येणार आहे . ग्रामस्थ , सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले . 

दोन किमी परिसरात आंबा , सिताफळ , रामफळ , जांभूळ , पळस , उंबर , करंज , कडूलिंब , बेल , जंगली अशा विविध प्रकारच्या ३०० झाडांची लागवड करण्यात आली . दरम्यान कोरोनाच्या पाश्वभुमीवर प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते . डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता . अलिबाग यांच्यावतीने गेल्या १२ वर्षापासुन आत्तापर्यंत फळझाडे , औषधी वनस्पती , अशोक , सुरू , सिल्व्हा , वड , पिंपळ , आवळा , बेहडा आदी प्रकारांसह झाडांचे वृक्षारोपन करून प्रतिष्ठानच्या सदस्यां करवी त्याचे उत्तम संरक्षण , संवर्धन केले जात आहे . शेकडो झाडे जगवून शासकीय विदयानिकेतन पुसेगाव येथील झाडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत .

डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपणाचे कार्य कौतुकास्पद आहे . अनेक समाज हितपयोगी उपक्रमांतुन समाजात जनजागृती होण्यास मदत होत आहे . अनेक पिढ्यापासुन समाजसेवेचे कार्य करत असलेल्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यास आमचे पुर्णतःसहकार्य असेल . - महेश शिंदे , आमदार , कोरेगाव - खटाव विधानसभा*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies