सावधान महाराष्ट्रात "झिका"ची एन्ट्री
पुण्यात आढळला पहिला रुग्ण
महाराष्ट्र मिरर टीम-पुणे
पुणे जिल्ह्यातील बेलसर हे साडेतीन हजार लोकवस्ती असलेलं गाव असून येथे जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून तापाचे रुग्ण आढळून येत होते .16 जुलै 2021 रोजी येथील 5 रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील तीन रुग्णांना चिकनगुणियाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं.27 ते 29 जुलै 2021 या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू ,चिकनगुणिया विभागाचे प्रमुख डॉ योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ आरोग्य पथकाने बेलसर आणि परींचे या भागात भेट देऊन सुमारे 41 संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने संकलित केले. त्यापैकी 25 जणांना चिकनगुणिया तर 3 जणांना डेंग्यू झाल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून स्पष्ट झालं. तर बेलसर गावातील एका 50 वर्षीय महिलेला विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलैला प्रयोगशाळेने दिल्याने खळबळ उडालीय.