Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अतिवृष्टीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी

 अतिवृष्टीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी



दिनांक 11 ते 15 जुलै, 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे सदर कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्हयातील ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.


1. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. या कालावधीमध्ये आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये.


2. घरामध्ये पाणी घूसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सूरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.


3. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.


4. घराच्या अवती भवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तु विजेचे खांब किंवा तारा. झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.


5. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.


6. आपले जवळ दैनंदिन लागणारे औषधे, केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात,मोबाईल फोन, बॅटऱ्या चार्ज करून ठेवाव्यात


7. अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुखा मेवा खादयपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.


8. अतिवृष्टीबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा, रेडीओसाठी काही जास्त सेल/वेंट या जवळ ठेवाव्यात.


9. अतिवृष्टी फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र/खाडी किनारी व नदीकिनारी राहणा. या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व घराबाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.


10. पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्र/खाडी, तलाव, धबधव्याच्या ठिकाणी जावू नये. घरीच थांबावे


11. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, मोबाईलचा वापर करु नये.


12. ग्रामकृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसिल कार्यालयास माहिती द्यावी.


13 ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी पाठवताना कोविड रुग्ण एकमेकांत मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.


14. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे


15. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02141-222097/227452 वर संपर्क साधावा किंवा 8275152363 नंबर वर व्हॉटसअॅप करावे.


जिल्हा प्रशासन, रायगड अलिबाग

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies