नाना पटोले यांनी शत्रू पक्षावर आरोप करायचे सोडून मित्र पक्षावर टीका करणे हे कितपत योग्य :आ.शशिकांत शिंदे
नाना पाटोलेंच्या विधानावर आ.शिंदेचे प्रतिउत्तर;नानांची विधाने महाविकास आघडीसाठी मारक.
प्रतीक मिसाळ -कोरेगाव
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला . माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे . त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे .
शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे कि , नाना पटोले यांच्याकडून सध्या आरोप केले जात आहेत . त्यांच्याकडून शत्रूवर आरोप करायचे सोडून मित्रांवर आरोप केले जात आहेत . हे कितपत योग्य आहे . पाळत ठेवली जात असेल तर पटोले यांनी त्यांच्या नेत्यांशी अंतर्गत चर्चा करायला हवी.अशा गोष्टींची जाहीर वाच्यता करणे कितपत योग्य आहे ?, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी नाना पटोले यांना विचारला आहे .यातून विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळत आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवर याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नानांनी आपली भूमिका मांडताना विचार करावा.
दरम्यान , उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणी चांगलेच संतापले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे . नाना पटोले यांच्या अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची अजित पवार यांनी म्हंटल आहे. नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी आहे , यामुळे महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनमध्ये संभ्रमावस्था झाली आहे,असं अजित पवारांचं म्हणणं आहे .