Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ , निसर्गाबरोबर पर्यावरण संवर्धनाचे - जिल्हाधिकारी शेखर सिंह

 निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ , निसर्गाबरोबर पर्यावरण संवर्धनाचे - जिल्हाधिकारी शेखर सिंह 

निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण 

प्रतीक मिसाळ-सातारा


संतांनी निसर्गात देव शोधला . हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे . निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे , असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले . पुनर्वसीत डिचोली ( धोंडेवाडी ) ( ता . कराड ) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित ' संकल्प 221 वृक्ष लागवडीचा ' या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते . यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे , तहसीलदार अमरदीप वाकडे , निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे , सहप्रमुख रणजित पाटील . सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर , गौतम करपे , संदीप सुर्यवंशी , अभिजीत सुर्यवंशी , डॉ . अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे , सरपंच रेखा काकडे , उद्योजक बाळासाहेब कोळेकर , माणिक गंगवणे , अनिल पवार , संजय काकडे , शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . शेखर सिंह म्हणाले , निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे . गझाडे म्हणजे देव आहेफ झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे . निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे . जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला . त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले . अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे . अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते . याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे . वृक्षतोड कारणीभूत आहे . या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल . पहिला पाऊस जून - जुलै , ऑगस्ट मध्ये पडत होता . मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे . यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे . आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे . आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा . डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील . सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात . सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे , याचे समाधान आहे . सतीश मोरे म्हणाले , 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे . मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे . मागील वर्षी मनमंदिर वारी केली . यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता . ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला . आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली . प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे . डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला . येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे . आज वारी सार्थकी लागली आहे . ' याच साठी केला होता अट्टाहास , शेवटचा दिन गोड व्हावा ' , याची प्रतिची आली . बाळासाहेब कोळेकर म्हणाले , तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत . जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत . निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे .प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु परिवाराच्या वतीने करण्यात आले . * वडाची डिचोली म्हणून गाव ओळखले जाईल ' पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत . येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत . वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी ग्रुपने घेतला आहे . आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत . यातील 75 झाडे वडाची आहेत . येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे . भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल , असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies