Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश

 मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश

प्रियांका ढम - पुणे


मातंग समाजाच्या अनेक संघर्षानंतर बिबवेवाडी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक उभे राहिले ,त्याबरोबर समाजाच्या हिताचे अनेक प्रकल्प या स्मारकात प्रलंबित आहेत .या ठिकाणी मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा ठराव असताना तिथे जलतरण तलाव बांधण्याचा घाट घातला जात आहे तसेच भवानी पेठ येथे लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा असून या ठिकाणी गरीब व गरजू तरुणासाठी क्रीडा संकुल उभारले आहे .यामध्ये व्यायामशाळा तसेच बॉक्सीग, कराटे,टेनिस ,योगासन सह इतर क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते .ते बंद करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे .याचा तीव्र निषेध करण्यासाठी पुणे शहरातील मातंग समाज मोठ्या संख्येने पुणे महापालिकेवर निषेध करण्यासाठी जमा झाला होता.या आंदोलनात दलीत समाजाच्या विविध पक्ष संघटना बरोबरच ,काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेसह बरेच पक्ष संघटनेचे नेते सहभागी झाले होते.या वेळी भारतीय जनता पक्षाच्या निषेधाचा घोषणा देण्यात आल्या .जातीयवादी भाजपा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

        या आंदोलनात राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप बोलताना म्हणाले की ,भारतीय जनता पक्ष हा सुड बुद्धीने वागत असून त्यांचा हा अन्याय सहन केला जाणार नाही .गरज पडली तर आपण कोर्टात ही जाण्याची तयारी करू. महाराष्ट्र शासन आपले असून मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्या समोर आपल्यावरील अन्यायाची माहिती देऊ असे आश्वासन दिले.

                शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या मनोगतात भाजपा करीत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. व शिवसेना या आंदोलानला पाठिंबा देत असल्याचे सांगितले .

          माजी मंत्री रमेश बागवे यांनी बहुजन समाजाच्या स्मारकाबाबत भाजपा घेत असलेल्या भूमिकेबाबत त्यांना याची किमंत जनता दाखवून देइल असा इशारा दिला.

           या आंदोलनात पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली ताई धुमाळ ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे,लोकजनशक्ती चे अनिल हातागले ,भीम आर्मी चे अध्यक्ष दत्ता पोळ ,नगरसेवक हाजी गफुर पठाण ,भीम छावा अध्यक्ष श्याम गायकवाड ,रीपाई शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड ,दलीत युवक आंदोलन प्रदेशाध्यक्ष सचिन बगाडे,सचिन जोगदंड लहुजी शक्ती सेना अध्यक्ष ,मनोज कांबळे ,लोकजनशक्ती शहराध्यक्ष संजय आल्हाट यासह विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies