"छडी लागे छमछम विद्या येई घमघम....!" - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

"छडी लागे छमछम विद्या येई घमघम....!"

 "छडी लागे छमछम विद्या येई घमघम....!"

प्रियांका ढमहरवली माझी शाळा आणि हरवले माझे बालपण .....

ये आई मला पावसात जाउ दे ...चिखलात मनमुराद खेळू दे मस्त नाचू दे बागडू दे ....!! 

आई अरे बाळा नको बाहेर कोरोना आहे माती मधे जंतू ,कीडे असतात आणि पावसाच्या पाण्याने तू आजारी पडणार पुन्हा सर्दी ताप खोकला आला तर "कोरोना "होऊ शकतो असे आता संभाषण ऐकू येते मग आपण आपल्या मुलाचं बालपण हिरावून घेतोय अस वाटतं नाही का ? आपल्या वेळी चिखल माती शेण सर्व तुडवत शाळेच्या एकाच पाणपोई वर सर्वच नळाला तोंड लावून पाणी पित होतो तेव्हा कुठे होते प्युरिफायर आणि Sanitizer तरीपण आपण ठणठणीत होतोच की पण गेल्या १.५ वर्षात या कोरोना नावाच्या विषाणू ने असा काही आपल्या भारतात आणि भारतीयांच्या डोक्यात शिरकाव केला की तो कोरोना जायलाच मागेना ,


शाळा बंद,खेळ बंद , मित्र - मैत्रीणी ,फिरणं बंद ,यामुळे आता मुले चीड चीड करू लागली ऑनलाईन शिक्षण किती प्रभावी आपल्या कडे होऊ शकत? हा प्रश्न आहेच जिथं  गुरू- शिष्य परंपरा कायम आहे त्यामुळे आता मुलांची पाटी कोरी झालेली आपल्याला पाहायला मिळेल ना शिक्षकांचा धाक आहे ,ना आता छडी चा आवाज आहे आता फक्त ट्रिंग ट्रिंग  फोन ची घंटी वाजली की ऑनलाइन क्लास ची वेळ झाली एवढंच मुलांना कळत आता नवीन शाळेत जाणाऱ्या मुलांना तर शाळा काय असते कशी असते इथून सुरुवात आहे गेल्या वर्षी पासून ची मुले प्ले- ग्रुप ऑनलाईन च अभ्यासत होती आणि आता ती नर्सरी मधे गेली सुद्धा घरात बसून च दुसऱ्या वर्गात प्रवेश! नववी- दहावी पण सहज पास किती मज्जा आली असती त्या मुलांना जर शाळा असती लवकर जाऊन नवीन इयत्तेत पहिला बेंच पकडणे असो नाहीतर त्यावर आपल्या मैत्रिणी साठी ,मित्रासाठी जागा धरणे असो अश्या एक ना अनेक गमती जमती ही मुले अनुभवू शकत नाहीत त्यामुळे मुले ही एकलकोंडी ,निराश ,आणि आळशी होऊ लागलेत की काय असं वाटू लागलं आहे फक्त मोबाईल फोन मधे च त्यांचं सर्व भविष्य आणि वर्तमान चालला आहे आणि मुले बोलकी ,भावनिक न होता स्मार्ट फोन सारखी स्मार्ट होऊ लागली आहेत 


त्यासाठी पालक म्हणून पालकांनी पण आपल्या मुलांबरोबर सुसंवाद साधला पाहिजे ,त्यांना छोटी छोटी कामं सांगून त्यांची शारीरिक हालचाल आणि विचार करायला लागणाऱ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत घरगुती उपक्रम दिले गेले तर ते आवडीने करतील छोट्या छोट्या त्यांना आवडणाऱ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत मग पाककलेपासून ते बागकाम असेल आता बरेच सण आहेत त्याची पूर्वतयारी कलाकुसर ( राखी बनविणे,आकाशकंदील तयार करणे , ई . ई ) मग मुलांना पण हुरूप येईल आणि ते आवडीने सर्व करतील आपण आपल्या मुलांना कस वागवतो हे देखील इथे महत्वाचे ठरते केवळ मोबाइल घेऊन बसू दे अशी भावना ठेवू नका तुम्ही पण त्यांच्या जवळ बसून अभ्यास घेणे ई .गोष्टीत स्वताहून लक्ष घालून ते त्यांच्याकडून करून घ्या हसत - खेळत मनोरंजनातून प्रबोधन अभ्यास मानसिक स्वास्थ्य आणि व्यावहारिक बाबी आता घरातूनच शिकवण्याचा प्रयत्न करा .आता शाळा घरातूनच शिकवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मुलांचं बालपण त्यांना जगू द्या मनमुराद आनंद लुटू द्या !!!

No comments:

Post a Comment