इंदापूर तालुक्यातील डिकसळ जिल्हा परिषद शाळेला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची अचानक भेट
सतीश पवार- इंदापूर
डिकसळ ( ता . इंदापुर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अचानक भेट देऊन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदुळ व धान्यादी मालाच्या दर्जाची स्वतः तपासणी केली . तसेच ओसरी शाळेची पाहणी केली . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिकसळ येथे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जून व जुलै या दोन महिन्याचे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार किलो तांदूळ एक किलो हरभरा एक किलो मुग डाळ धान्याचे वाटप करण्यात येत होते .त्याचप्रमाणे आज ओसरी शाळेसाठी दहा विद्यार्थी हजर होते.योग्य ती खबरदारी घेऊन रोज ओसरी शाळेसाठी उपस्थित राहण्यासाठी राज्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थी व पालक यांना आवाहन केले .
शाळेचे मुख्याध्यापक देवानंद शेलार व उपशिक्षिका सुरेखा वाघ या दोघांचे तांदूळ वाटप व्यवस्थेबद्दल व ओसरी शाळा सुरू असल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कौतुक केले . यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड इंदापूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस रावसाहेब गवळी , पोलीस पाटील संदीप पवार , जिजाराम पोंदकुले , महेंद्र सवाने , तानाजी हगारे , सुहास गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते .