Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महामार्गावर अडकलेल्या शेकडो ट्रकचालकांना अल्पोपहार व पाण्याची बॉटलची केली सोय

 महामार्गावर अडकलेल्या ट्रकचालकांची तहान व भूक भागवण्यास धावले साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद चव्हाण साहेब ! संकटकाळी माणसूकीचे दाखवले दर्शन 

महामार्गावर अडकलेल्या शेकडो ट्रकचालकांना अल्पोपहार व पाण्याची बॉटल देण्यात आले.

प्रतीक मिसाळ सातारा

कोल्हापूर,सांगली, सातारा, चिपळूणमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा महामार्गावरूनजाणारे सर्व अवजड वाहने पोलीसांनी सुरक्षितेसाठी अडवली आहेत. अचानक ही वाहने अडविली गेल्याने फार अशी तजवीज न करता निघालेल्या वाहन चालकां पुढे भीतीचे साम्राज्य पसरले. अगदीच रस्त्यावर थांबता येईल, ट्रक वाहनात झोपता येईल, मात्र भुकेने तोंड वर काढले की आता करायचे काय हा प्रश्न राहिला होता. तेंव्हा त्यांच्या मदतीस धावून आले सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण साहेब व  परिवहन कार्यालयाचे त्यांचे सहकारी. भूक आणि तहानेने व्याकूळ झालेल्या ट्रक चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही श्री विनोद चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पोपहार जेवण व पाण्याची बॉटल देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले की ,परजिल्ह्यातील ओढवलेल्या परिस्थितीमुळे अवजड वाहने थांबवली गेली आहेत .अचानकपणे आलेल्या अडचणी अथवा संकट वेळी अकल्पित झालेली मदत ही खऱ्या अर्थाने पुण्याचे काम आहे .अशावेळी उपप्रादेशिक कार्यालयातील माझ्या सहकार्यांनी केलेली मदत लाख मोलाची आहे. संकट सर्वांवर ओढवतात अशावेळी माणुसकी म्हणून अडकलेल्या ट्रक बांधवांना अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था केली आहे. सामाजिक काम करण्या सारखे दुसरे कोणतेही समाधान नाही अशी प्रांजळ भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली .

आनेवाडी टोल नाका महामार्गावर  अडकलेले ट्रकचालक व त्यांचे व त्यांचे सहाय्यक यांना त्यांच्या जागेवर जाऊन त्यांना मदत करण्यात आली. यावेळी त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे व संवेदनशील हातांनी केलेल्या मदतीने राज्यातील व परराज्यातील ट्रक चालक व प्रवासी भारावून गेले. त्यांनी या केलेल्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .यावेळी आकाश गालिंदे, सागर भोसले, आसिफा मुलांणी, सुप्रिया गावडे ,निलेश सावंत,गवळी साहेब, एन एम पाटील,सागर घनवट तसेच सर्व सब इंस्पेक्टर व स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies