दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

 दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

प्रतीक मिसाळ सातारा


दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा त्यांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक घेण्यात यावी या मागण्यांसाठी इतर मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले . सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रॅम्प वॉक व व्हील चेअर उपलब्ध करून द्यावी , दिव्यांगांना राज्य शासनाकडून एक हजार रुपयांची मदत वाढवून महिना पाच हजार मिळावी . सातारा जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये लिफ्टची सोय करण्यात यावी , सातारा पंचायत समितीमध्ये दिव्यांग व्यक्ती व महिला यांना बाथरूमची सुविधा करण्यात यावी , सर्व शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे तसे फलकही लावण्यात यावेत , दिव्यांगांसाठी अनुशेष भरण्यात यावा , या दिव्यांगांना पदोन्नती देण्यात यावी , दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळणे आवश्यक आहे , शासन निर्णय सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी जिल्हास्तरीय समिती तात्काळ गठीत करून दोनशे स्क्वेअर फुट जागा दिव्यांगांना देण्यात यावी , संजय गांधी निराधार योजनेचा विशेष थांबा चालू करावी कर्मचारी सेवा जेष्ठता यादी सादर करण्यात यावी १५ वा वित्त आयोग अंतर्गत देणाऱ्या निधी दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात यावा ,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या . दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .

No comments:

Post a Comment