तुझी आठवण ही वैभव आंबोलकर यांची कविता - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, July 5, 2021

तुझी आठवण ही वैभव आंबोलकर यांची कविता

तुझी आठवण

             कवी-वैभव आंबोलकर...........


 

जीव तुटका होतो बोलण्यास,

तुला एक वेळ पाहण्यास,

तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस
नाही संपत तो प्रवास…”
तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष…”
विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..”
आज‬ परत ‪तुझ्या आठवणीने‬

‪दर्द ए गम‬ ची ‪धुंद‬ मनाला ‪छ्ळु‬
लागलीय. आज परत ‪‎तुझी‬ आठवण
‪हृदयाचे‬ ठोके ‪चुकवू लागलीय‬..”
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..

हल्ली खूप दूर तू अन
आठवण तरंगते डोळ्याशी..”
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो..
खोटं खोटं हसताना

कळलेच नाही, कधी रडु लागलो…”


No comments:

Post a Comment