Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बोंडारवाडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच:आ.शिवेंद्रसिंहराजे

 बोंडारवाडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच:आ.शिवेंद्रसिंहराजे

ना.अजितदादा यांचे लाखमोलाचे सहकार्य असल्याने प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेणार

              प्रतीक मिसाळ-सातारा


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोंडारवाडी धरण प्रकल्पास मदत करत असल्याने व बोंडारवाडी ग्रामस्थ यांनी काही मुद्यावर या प्रकल्पास सहमती दिल्याने हा प्रश्न निश्चितच लवकारात लवकर मार्गी लागेल असा विश्वास आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला . सध्या तालुक्यात कण्हेर , महू , हातगेघर , धरणानंतर केळघर केडंबे विभागात होवू घातलेल्या बोंडारवाडी धरणाचेवरुन विभागात काही लोकांकडून गटातटाचे राजकारणाला खतपाणी घातले जात आहे . धरणाची भिंत उभी राहाण्यापूर्वीच तीला उभा तडा जात आहे . तो तडा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जोडण्याची गरज आहे . या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दुर करण्यासाठी व प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे पत्रकार परिषद आयोजीत केली होती .

 या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले , पुढील ५० वर्षाचा विचार करून मेढा , केळघर परिसरातील ५४ गांवाच्या पिण्याच्या पाण्याचा , तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीच बोंडारवाडी धरण प्रकल्प उभा राहात असून यामध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये . तालुक्याचा आमदार या नात्याने हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मी निश्चित पाठपुरावा करत आहे . बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मुद्यावर या प्रकल्पाला मान्यता दिल्याने या कामाला आता गती येईल . त्या ठिकाणी बंधारा नव्हे तर धरणच होणार असून त्याबाबत कोणीही जनतेमध्ये गैरसमज पसरवू नयेत असा ही इशारा आ . भोसले यांनी दिला आहे . बोंडारवाडी धरण कृती समितीचे विजयराव मोकाशी यांच्याबरोबर आम्ही होतो . चक्काजाम आंदोलनातही आम्ही सहभागी होतो . राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार व संबधीत अधिकारी यांच्याशी अनेक वेळा बैठका व विचारविनीमय झाला आहे . मी हातात घेतलेली कुठलीही कामे अपूर्ण ठेवली नसून हा प्रकल्प पुर्णत्वास नेहणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . ज्या क्षमतेची या धरणास मान्यता आहे त्या क्षमतेचेच हें धरण होईल . भिंतीला ग्रामस्थांचा विरोध होता . भिंत खाली झाली काय किंवा वर सरकवून झाली काय याला महत्व नसून धरण होणे महत्वाचे आहे . यामध्ये कोणीही राजकारण करू नये . मीच काय पण दुसऱ्या कोणीही हा प्रश्न मार्गी लावावा . पण धरण व्हावे हीच सर्वांची मानसीक इच्छा आहे . या प्रकल्पात २५ हेक्टर शेतजमीन जात असून त्या जमीनीचा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठीही आपण पाठपुरावा करत असल्याचे आ . भोसले यांनी यावेळी सांगीतले .

या बैठकिला मेढा नगरपंचायतीचे समाजसेवक ज्ञानदेव रांजणे , नगराध्यक्ष पांडूरंग जवळ , उपनगराध्यक्षा कल्पना जवळ , कांतीभाई देशमुख , रामभाऊ शेलार , बंडूशेठ ओंबळे , हरिभाऊ शेलार , दत्ताआण्णा पवार , तुकाराम धनावडे , राजेंद्र जाधव , सुरेश जवळ , बबन बेलोशे , प्रविणमहाराज शेलार अंकुश बेलोशे यांच्यासह ५४ गांवातील ग्रामस्थ , पदाधिकारी उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies