Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साखरोणे येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमीपूजन संपन्न

 साखरोणे येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमीपूजन संपन्न

अमोल चांदोरकर - श्रीवर्धन 


श्रीवर्धन तालुक्यांतील साखरोणे, धारवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ईमारतीचे भूमीपूजन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या शुभहस्ते तसेच मा. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.हिंदुह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त साखरोणे, धारवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ईमारतीचे नामकरण करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंन्त्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यावरण मंन्त्री अदित्यजी ठाकरे, रायगड जिल्हा संपर्क मंन्त्री अनिल परब साहेब यांच्यातर्फे भविष्यात देखील विकासकामांचा जोर वाढवून श्रीवर्धन विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे यांनी केले. तर श्रीवर्धनमध्ये शिवसेना वाढीसाठी जनसंपर्क अभियनाच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहचवण्याचे आवाहन मा. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले.

यावेळी श्रीवर्धन पंचायत समिती सभापती मा.श्री.बाबुरावजी चोरगे,श्रीवर्धन ता. संपर्क प्रमुख मा.श्री.सुजितजी तांदळेकर  ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच विभागातील सर्व शिवसैनिक उपस्थितीत पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies