Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

Redmi Note 10T 5G : प्रतीक्षा संपली, रेडमीचा जबरदस्त 5G स्मार्टफोन 'या' तारखेला भारतात लॉन्च होणार

 Redmi Note 10T 5G : प्रतीक्षा संपली, रेडमीचा जबरदस्त 5G स्मार्टफोन 'या' तारखेला भारतात लॉन्च होणार

ज्ञान तंत्रज्ञान
अनुप ढम

Redmi Note 10T 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये कधी लॉन्च होणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. आता याची प्रतीक्षा संपली असून हा स्मार्टफोन 20 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. काल, सोमवारी Xiaomi कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. नवीन रेडमी नोट 10 सिरीज लॉन्च केल्यानंतर Redmi Note 10, the Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max सोबत हा नवीन Redmi Note 10T 5G देखील आता मिळू शकणार आहे.

Redmi Note 10T 5G च्या लॉन्चिंग संदर्भात Xiaomi India Communications चे प्रमुख Kasturi Paladhi यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात भारतात हा फोन 20 जुलैला लॉन्च होणार असल्याचं म्हटलं आहे. मागील आठवड्यातच Amazon नं रेडमी नोट 10टीच्या भारतातील लॉन्चिंगसंदर्भात एक टीजर प्रसारीत केला होता.

रेडमी नोट 10टी (Redmi Note 10T 5G) ची किंमत भारतात किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा स्मार्टफोन रशियन व्हेरियंटसारखा दिसत आहे. हा फोन रशियामध्ये जवळपास 20,500 रुपये किमतीमध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 10टी 5जी स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 11 वर आधारीत आहे जो MIUI वर काम करेल.

हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच फुल एचडी+ (1,080x2,400 पिक्सल) असा असेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर असेल तर 6GB रॅम असेल. या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. सोबतच 2 मेगापिक्सलचा मायक्रो तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देखील आहे.सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आठ मेगापिक्सल कॅमेरा आहे. फोनला 128 जीबीचं स्टोअरेज दिलं आहे. तर 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies