खोपोली शहरातील काजूवाडी परिसरात दरड कोसळली ...आणि रातोरात हटवली - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

खोपोली शहरातील काजूवाडी परिसरात दरड कोसळली ...आणि रातोरात हटवली

 खोपोली शहरातील काजूवाडी परिसरात दरड कोसळली ...आणि रातोरात हटवली 

गुरुनाथ साठेलकर-खोपोली


खोपोली शहरात दि, ११ जुलै रोजी संततधार सुरु होती,  दिवसभर पावसाने उसंतच  घेतली नव्हती. सह्यादीच्या कड्यावरून धबधबे कोसळू लागले होते. बऱ्याच दिवासानि पावसाची पुन्हा दमदार सुरवात झाल्याने अबीगची होणारी  लाही लाही थांबली होती. रात्री ८.४५ च्या सुमारास काजूवाडीच्या टेकडीचा काही भाग कोसळल्याची खबर  मिळताच सर्वजण हादरले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे युवा सदस्य रोशन पलांडे यांच्या हि घटना प्रथम लक्षात आल्यानंतर त्यांनी  महामार्गावर पडलेली माती आणि मलब्यामुळे वाहनचालकांना बाधा येऊ नये म्हणून सुरक्षिततेची खबरदारी घेऊन वाहतूक नियंत्रित केली. 

काजूवाडीच्या परिसरात घडलेली हि घटना वाऱ्यासारखी पसरली, खोपोली नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक, खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे सदस्य, वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. तातडीची उपाययोजना म्हणून सेफ्टी कोण लावून वाहतूक सुरक्षित केली. अय्यर ब्रिगेडची टीम पाचारण करून रातोरात मलबा  हटवला गेला. आज रोजी दिवस उजेडी नारपालिका, वन खाते, महामार्गाचे कंत्राटदार, अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनि संयुक्त सर्व्हेक्षण केले, काजुवडी येथे झालेल्या पडझडीच्या संदर्भात आज खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमनताई औसरमल यांच्या कक्षात तातडीच्या बैठकीचे आयोजन केले गेले. त्यावेळी जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नगर अभियंता, वनखात्याचे अधिकारि, रिगल कंस्ट्रक्शनचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते राजन सुर्वे, अपघात टीमचे गुरूनाथ  साठेलकर हे उपस्थित होते. तातडीने उपाययोजना करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा निर्णय झाला आहे.

No comments:

Post a Comment