ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता येत नाही त्यांनी शिवसेनेला सल्ला देण्याची गरज नाही : ना. उदय सामंत - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता येत नाही त्यांनी शिवसेनेला सल्ला देण्याची गरज नाही : ना. उदय सामंत

 ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता येत नाही त्यांनी शिवसेनेला सल्ला देण्याची गरज नाही : ना. उदय सामंत

              भिमराव कांबळे :कोल्हापुर 


ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता येत नाही त्यांनी शिवसेनेला सल्ला देण्याची गरज नाही अशी टीका उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी अनेक नेत्यांवर नाव न घेता चौफेर टीका केली.

     शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जुलै ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना ना. उदय सामंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता येत नाही त्यांनी शिवसेनेला सल्ला देऊ नये, शिवसेनेवर टीका करू नये तसेच आम्हाला डीवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो, असंही. ना उदय सामंत म्हणाले.

     
शिवसेनेला आणि शिवसेनेच्या नेत्याला बदनाम करण्याचे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. भविष्यात सिंधुदुर्गचा पंतप्रधान झालात तरी आणि महाराष्ट्राचे ४० कॅबिनेट मंत्री झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशी टीका केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर नाव न घेता ना. उदय सामंत यांनी केली.

     गोकुळ संघात अनेकांनी राजकारण केले. दूध संघाला घरच्या सारखे वापरले. संघाचा शेतकऱ्यांना किती फायदा करून दिला हे आपणाला माहीत आहेच.  यापुढेही शिवसेनेच्या संचाकलकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहीले पाहिजे असेही ना. उदय सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment