कोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यां मध्ये महिलाराज - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

कोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यां मध्ये महिलाराज

 कोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यां मध्ये महिलाराज

भिमराव कांबळे :कोल्हापुर 

जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे लक्ष लागून असतानाच सभापती पदासाठीच्या नावावर अखेर शिकामोर्तब झाले. चारही सभापती पदे महिलांना देण्यात आल्याने विषय समित्यांवर महिला राज असणार आहे हे निश्चित झाले आहे. .

     जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी सोमवारी पार पडल्या. यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडी कडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने विषय समित्यांच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देखील कायम होती. अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सकाळी पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अखेर विषय समित्यांच्या सभापती पदासाठी नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये खासदार संजय मंडलिक गटाच्या शिवानी भोसले यांना महिला व बालकल्याण समिती सभापती पद, तर  आमदार प्रकाश आबीटकर गटाच्या वंदना जाधव यांना बांधकाम, माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या कोमल मिसाळ यांना समाजकल्याण आणि अपक्ष सदस्या रसिका पाटील यांना शिक्षण व अर्थ सभापती पदावर शिकामोर्तब झाले.

No comments:

Post a Comment