काशीद पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे,आणखी बळी जाण्याची भीती:-महेश मोहिते - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, July 18, 2021

काशीद पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे,आणखी बळी जाण्याची भीती:-महेश मोहिते

 काशीद पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे,आणखी बळी जाण्याची भीती:-महेश मोहिते

अमूलकुमार जैन-अलिबाग


मुरूड तालुक्यातील काशीद पुलाचे नव्याने काम सुरू आहे मात्र सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे काम  सुरू आहे.पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख महेश मोहिते यांनी काशीद येथे व्यक्त केली.

    मुरूड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला धुंवाधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने मुरुड तालुक्यातील  अलिबाग मुरूड रस्त्यावरील काशीद गावानजीक असणारा पूल हा 11 जुलै2021रोजी रात्री आठच्या सुमारास पूल वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता


मुरूड तालुक्यातील काशीद येथे नवीन पुलाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे.मात्र या कामामध्ये शासनाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाचा ढिसाळपणा समोर आला आहे.सदर पुलासाठी डोंगरकडून येणारे  पाणी हे समुद्राकडे वाहून जावे यासाठी पाईप टाकण्यात येत आहे.मात्र हे पाईप टाकत असतांना पुरेशी काळजी न घेता टाकण्यात आल्याने पाईप हे जाग्यावरून निघून गेले आहे.पाईप लावत असताना आवश्यक असणारी जागा ही व्यवस्थित न करता पाईप पुलासाठी वापरण्यात आले.मात्र रविवार दिनांक 18 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार सदर पाईप हे जाग्यावरून निसटले आहे.सदर पुलाची दुर्घटना झाली तेव्हा काही नेते मंडळी यानी सदर पुलाचे काम आम्ही सुरू केले आहे असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे.तर स्थानिक पदाधिकारी यांनी आजपर्यंत या पुलास भेट दिली नाही.

 काशीद पुलाचे काम सुरू केले असतानाच काशीद ग्रामपंचायत हद्दीतील चिकणी येथील पूल खचला असल्याने तेथे कोणीही जाऊ नये यासाठी अडथळा निर्माण केला आहे.

काशिद पुलाचे काम योग्य पद्धतीने नाही झाल्यास भारतीय जनता पक्ष हा आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा मोहिते यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment