चिपळूण शहरात वाशिष्ठी नदी पाण्याच्या पातळीत वाढ अतिवृष्टीचा अंदाज असल्याने सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा
ओंकार रेळेकर-चिपळूण
तालुक्यात गेली आठवडा भर पावसाचा जोर कायम असला तरी बुधवारी दुपार पर्यंत पावसाने सबुरी घेतली होती आणि अचानक सायंकाळी पावसाचा जोर वाढला.
गेली चारपाच दिवस चिपळूण मध्ये पावसाने हाहाकार माजवला असून शहरात वाशिष्ठी नदीला पाण्याची पातळी वाढली आहे बुधवारी रात्री ८.३० वा. नंतर पाणी हळू हळू नाईक कंपनी नव्या आणि जुन्या पुलाच्या वरून वाहू लागले आधी कोरोना संकट, सतत चे लॉकडाऊन या संकटाने हैराण झालेला व्यापारी वर्ग पुराचे पाणी वाढते का या चिंतेने व्याकुळ झाला आहे.बुधवारी रात्री ९ वा च्या सुमारास वाशिष्ठी नदी आणि शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली होती या मुळे बाजारपेठेतील नाईक कंपनी नव्या पुलावरील वाहतूक उकताड मार्गे तर खाटीक आळी ,रंगोबा साबळे रोड वरील वाहतूक बाजारपेठ मधील वनवे रोड वरून सुरू होती ,पेठमाप,मुरदपूर,गोवळकोट,फरशीतिठा,वाणीळी,शंकरवाडी,खेर्डी ,माळेवाडी,गांधीचौक,बाजारपेठे आदी ठिकाणी पुराचा मोठा धोका संभावत असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.चिपळूण तालुक्यात मागील आठवडा भर पाऊस मुसळधार पडत असून बुधवारी सकाळी खूप दिवसांनी नागरिकांना ऊन दिसले परंतु अगदी मोजक्या मिनिटांत सूर्यप्रकाश गायब होऊन पाऊसाची ये जा सुरू होती यातच सायंकाळी पाऊस जोरदार पडू लागला अखेर रात्री ८.३० नंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाली,चिपळूण प्रांताधिकारी प्रवीण पवार,तहसीलदार जयराम सूर्यवंशी,मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून शासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये,पाण्याच्या प्रवाहातून वाहने नेऊ नये,पाण्याचा अंदाज आल्या शिवाय पाण्यातून पुढे चालू नये नदी लगत च्या रहिवासीयांनी सतर्क राहून आपले गृहउपयोगी सामान आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहिती नुसार शिरगाव पुलावरून सुमारे दीड फूट उंचीवरून पाणी वाहत होते येथील बाजारपेठ उंचावर असल्याने व्यापारी वर्गाला तेवढाच एक दिलासा आहे .