Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जोराच्या पावसाने महाबळेश्वर ला झोडपले;वेण्णा लेकचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली

 जोराच्या पावसाने महाबळेश्वर ला झोडपले;वेण्णा लेकचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली

प्रतीक मिसाळ- महाबळेश्वर

गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे . वेण्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने महाबळेश्वर- पाचगणी रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता . तसेच वाहतूक ही मंदावली होती . तर महाबळेश्वर परिसरातील पावसाच्या थैमानाने वीजपुरवठा खंडीत झालेला आहे . महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांत 164 मि . मि पावसाची नोंद झाली आहे .

गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे . तर हवामान खात्याने 5 दिवसाचा सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे . जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे महाबळेश्वर आहे , या परिसरात पावसाने थैमान घातले आहे . जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेला पाऊस धुवांधार पणे सुरूच असून जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार कोसळणारा पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे . या संततधार पावसाने महाबळेश्वर पांचगणी मुख्यरस्ता हा वेण्णालेक नजीक मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला होता . तर , बुधवारी सकाळी व सायंकाळी देखील धुवांधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती . या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती .

तसेच आंबेनळी घाटात व मेढा केळघर घाटात रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे व तापोळा रस्त्यांवर किरकोळ प्रमाणात दरड कोसळत असल्याने वाहतूक सावधगिरीने करावी लागत आहे . संततधार पावसाने महाबळेश्वरचे निसर्गवैभव खुलले आहे . पावसाळी हंगामास बहर आला आहे . येथे पर्यटनास आलेले पर्यटक या मुसळधार कोसळणाऱ्या पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटत आहेत . येथील वेण्णा नदी देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत . तसेच परिसरातील धबधबे देखील मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत .

पावसामुळे वीजपुरवठा खंडित...


सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे . महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे . तालुक्यात पडत असलेल्या या पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झालेला आहे . येथील ट्रांसफार्मर बदलण्याचे काम वीज वितरण विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून करताना दिसत आहे.ट्रान्सफॉर्मर बंद झल्याने काही काळ लगतची गावे अंधारात गेली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies