"कर्जतच्या पर्यटनाला चालना मिळावी"!!
कर्जत पर्यटन क्षेत्रातील एक अग्रगण्य ठिकाण ! पण हेच पर्यटन बहरते पावसाळ्यात कारण निसर्गाची भुरळ इथे तेव्हाच खास असते. ह्याच पावसाळ्यामुळे कर्जतची आर्थिक व्यवस्था सदृढ होते. बाकीच्या दिवसांमध्ये कर्जतला पर्यटन असते पण ते विशेष असे नसते म्हणजे एकंदरीत पावसाळ्यात कर्जत तालुक्यात गर्दी वाढते, हे मान्य करावेच लागेल.
मला ह्या कर्जतचा एक नागरिक म्हणून असे वाटते की, ह्या काळात कर्जतकरांनी आपली आर्थिकता कशी मजबूत होईल ह्यावर विचार करायला पाहिजे कारण अनेक राज्यांनी पर्यटनासाठी कित्येक प्रयत्न केले परंतु त्यांना यश मिळवता आले नाही आणि कर्जतला मात्र ही विशेष संधी चालून येत असते. ह्यावर खरोखरंच विचार करणे गरजेचे आहे. आता गर्दी म्हटली की रस्त्यावर गाड्यांची रहदारी वाढणारचं ह्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत आणि त्यावर लवकरचं यश मिळेल, हेही नक्की पण त्यासाठी पर्यटन बंद करणे हा उपाय नाही कारण गोरगरिबांच्या पोटावर घाला घातल्यासारखे होईल. आधीच कोविडमुळे कित्येकांना झळ पोहचली आहे. त्यात आपले कर्जतकर सुद्धा सुटलेले नाहीत. पर्यटनामुळे आता कुठे सुरळीत होण्याची आशा वाटत आहे. साहजिकच मला असे वाटते की, प्रत्येक कर्जतकराने ह्यावर विचार करावा कारण आपल्यासाठी पर्यटन ही एक संधी आहे.
एका पावसाळी पर्यटनामुळे कित्येक छोटेमोठे उद्योगधंदे उभे राहतात. ह्या छोट्याश्या उद्योगधंद्यातून अनेक कुटुंबांच्या आर्थिक बाजू सावरल्या जातात. हाच विचार करून पर्यटन एक संधी आहे पण डोकेदुखी नक्कीच नाही, मला असे वाटते.
- *