रोटरी क्लबने केला पत्रकारांचा गौरव ...कोरोना योद्धा म्हणून केले सन्मानित - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 15, 2021

रोटरी क्लबने केला पत्रकारांचा गौरव ...कोरोना योद्धा म्हणून केले सन्मानित

 रोटरी क्लबने केला पत्रकारांचा गौरव ...कोरोना योद्धा म्हणून केले सन्मानित

सतीश पवार -इंदापूर

कोरोनाच्या काळात डॉक्टर , परिचारिका त्याचप्रमाणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांचा ' रोटरी क्लब ऑफ भिगवण यांच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले . पत्रकार सन्मानप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर , संस्थापक सचिन बोगावत , संजय खाडे , कमलेश गांधी , अकबर तांबोळी , डॉ . अमोल खानावरे , उपस्थित होते . डॉ . काशिनाथ सोलनकर , नितीन चितळकर , नानासाहेब मारकड , सुरेश पिसाळ , विजयकुमार गायकवाड आदी पत्रकारांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . सचिन बोगावत , पत्रकार नितीन चितळकर , डॉ . काशिनाथ सोलनकर , विजयकुमार गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून सन्मानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली .

कोरोनाच्या संकटामुळे समाजामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यावेळेस भिगवण परिसरातील पत्रकारांनी योग्य दिशा देण्याचे काम करुन समाजात जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले . डॉक्टर , परिचारिका व पोलिसांच्या बरोबरीने काम करणारे पत्रकार हेदेखील कोरोना योद्धेच आहेत . -सचिन बोगावत , संस्थापक अध्यक्ष , रोटरी क्लब भिगवण .*

No comments:

Post a Comment