Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे धुमशान १८ जागांसाठी तब्बल १०२ जणांचे अर्ज

 माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे धुमशान १८ जागांसाठी तब्बल १०२ जणांचे अर्ज 

प्रतीक मिसाळ -माण

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक प्रकारच्या राजकीय घडामोडीना वेग आला असून संचालक पदांच्या एकूण १८ जागांसाठी तब्बल १०२ उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे " बाजार समिती मध्ये एवढं काय गुपित आहे ? असा प्रश्न माण मधील सर्वसामान्य जनतेला पडत आहे . माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी ता.माण संचालक मंडळाच्या सन २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १८ जागांसाठी विक्रमी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही माण बाजार समितीचे एकूण २०६५ मतदार असून एकूण १८ संचालक निवडून येणार आहेत.सोसायटी मतदार संघातून ८ ९ ५ मतदार ११ संचालक निवडून देणार आहेत . त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी , दोन जागा महिलांसाठी , इतर मागास प्रवर्ग साठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी एक जागा आरक्षित आहे . ग्रामपंचायत मतदार संघातून ८३५ मतदार ४ संचालक निवडून देणार आहेत . व्यापारी व आडते मतदार संघातून ३३४ मतदार २ संचालक निवडून देणार आहेत.तर हमाल तोलारी मतदार संघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून त्यासाठी फक्त एकच मतदार आहे . माण तालुक्यातील सर्वच पक्षातील राजकीय मंडळींनी बाजार समितीची निवडणूक चांगलीच मनावर घेत स्वतंत्र पँनेल टाकले आहेत.त्यामुळे १८ जागासाठी १०२ अर्ज दाखल झालेत.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे भाजपा विरोधात शिवसेना -राष्ट्रवादी - राष्ट्रीय काँग्रेस पक्ष एकत्र येऊन आघाडी करत बाजार समितीची निवडणूक लढवतील असे सर्वांना वाटत होते.मात्र शिवसेनेने स्वबळाची तयारी केल्याने सुरूवातीला दुरंगी वाटत असलेली निवडणूक नंतर तिरंगी होईल असे चित्र उभे राहिले . त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस , राष्ट्रीय काँग्रेसने आमचं ठरलंयच्या टिममधील सदस्यांना बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले.अर्ज भरायच्या आदल्यादिवशी जागा वाटपावर वाद झाल्याने आमचं ठरलय मधील सदस्यांनीही स्वबळावर लढायची तयारी करून स्वतंत्र पँनेल टाकत उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपानेही रासपला बरोबर घेत अर्ज भरलेत . त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रीय काँग्रेस , भाजपा - रासप , शिवसेना व आमचं ठरलंय मधील सदस्य अशा चार प्रमुखांनी स्वतंत्र पँनेल टाकत उमेदवारी अर्ज दाखल केलेत . त्यामुळे निदान आतातरी चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे . उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी मोठा असल्याने तोपर्यंत जागावाटपासाठी व मनधरणीसाठी अनेक बैठका होतील यात शंका नाही . त्यामुळे आता चौरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी होतेय की तिरंगी हे त्याचदिवशी समजेल . एकंदरीत आर्थिक अडचणीत असलेल्या बाजार समितीच्या १८ जागांसाठी १०२ अर्ज दाखल झाल्याने बाजार समितीत नक्की काय गौडबंगाल आहे... ? ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली असून तालुक्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केल्याचं चित्र सध्यातरी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies