Hyundai ची 'छोटू'.... 'सर्वात स्वस्त' SUV भारतात येणार, जाणून घ्या कधी होणार लाँच? - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

Hyundai ची 'छोटू'.... 'सर्वात स्वस्त' SUV भारतात येणार, जाणून घ्या कधी होणार लाँच?

 Hyundai ची 'छोटू'....

'सर्वात स्वस्त' SUV भारतात येणार, जाणून घ्या कधी होणार लाँच?

ज्ञान तंत्रज्ञान
अनुप ढम

ह्युंडाई (Hyundai ) कंपनीची 'मिनी एसयूव्ही' लवकरच भारतात लाँच होणार आहे, ही कंपनीची सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त एसयूव्ही देखील असेल. कंपनीची ही कार ​Hyundai Casper नावाने लाँच होईल.

ही 'मिनी एसयूव्ही' कंपनीची सर्वात छोटी कार असेलच, शिवाय कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही देखील असणार आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये अर्थात पुढील महिन्यात कोरियामध्ये या एसयूव्हीच्या प्रोडक्शनला सुरूवात होणार आहे. आधी ही कार कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, त्यानंतर अन्य देशांतील मार्केटमध्ये लाँच होईल.

Hyundai Casper नावाने होणार लाँच


कंपनी ही कार ह्युंडाई कॅस्पर (Hyundai Casper) नावाने भारतात लाँच करेल. पुढील वर्षी २०२२ च्या सुरूवातीला भारतात ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही कार कोडनेम ह्युंडाई AX1 नावाने ओळखली जात होती

अन्य डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी कंपनीने या कारचा एक टीझर जारी केला होता. या टीझरमध्ये कारचे हेडलँप्म आणि टेललँम्प दिसले होते. आता या कारची नवीन स्पाय इमेज समोर आली असून आता जवळपास पूर्ण प्रोडक्शन रेडी मॉडेल दिसत आहे. ही मिनी एसयूव्ही ब्रँडच्या सिग्नेचर एसयूव्ही डिझाइनमध्ये येईल.

पण भारतात लवकरच लाँच होणाऱ्या Tata HBX सोबत Hyundai Casper ची टक्कर असेल. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो-एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने Tata HBX ची झलक दाखवली होती. टाटाची ही मिनी एसयूव्ही ALFA मॉड्युलर (एजाइल लाइट फ्लेक्सिबल एडव्हान्स्ड ) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

आता भारतीय ग्राहक या गाडीला कसा प्रतिसाद देतो हे वेळ आल्यावर कळेल तसेच किंमत जर स्पर्धात्मक असेल तर अनेक जण या गाडीचा विचार करू शकतात 

 

No comments:

Post a Comment