Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सर्व धर्मीय पूरग्रस्त बांधवांच्या मदत कार्यात रिलीफ फाउंडेशन खेडची मदत ठरत आहे लक्षवेधी

सर्व धर्मीय पूरग्रस्त बांधवांच्या मदत कार्यात रिलीफ फाउंडेशन खेडची मदत ठरत आहे लक्षवेधी

  • कतार येथील तरुण उद्योजक आजिम धनसे  मित्रमंडळाचा विशेष पुढाकार
  • गरजवंतांना थेट मदत मिळत असल्याने आजिम धनसे,सिकंदर जसनाईक,खालिद चोगले,हनिफ घनसार बजावत आहेत देवदूताची भूमिका

ओंकार रेळेकर-चिपळूण


आखाती देशातील कतार येथील तरूण उद्योजक तथा खेड तालुक्यातील भोसते गावचे सुपुत्र आजिम धनसे आणि मित्रमंडळ यांच्या विशेष पुढाकाराने खेड रिलीफ फाउंडेशनने महापुराच्या संकट काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सर्व धर्मीय पूरग्रस्त बांधवांच्या मदत कार्यात रिलीफ फाउंडेशन खेड ची मदत  लक्षवेधी ठरत आहे.कोरोना संकटकाळ आणि महापुरात मदतकार्य करून आजिम धनसे यांनी आपल्या जन्मभूमी वरील प्रेम व्यक्त करीत खेड,चिपळूण, महाड मधील पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसोबतच रोख आर्थिक मदत करीत लोकांसाठी देवदूत बनून धावून आले आहेत.खेड चे माजी सभापती सिकंदर जसनाईक,सामाजिक कार्यकर्ते खालिद चोगले,हनिफ घनसार यांचे या कामी विशेष सहकार्य असून धनसे हे जसनाईक यांचे भाचे आहेत त्यांच्या आग्रहाने मदकार्याचे नियोजनबद्ध वाटप सुरू आहे.

         फक्त महापुरच नव्हे तर रिलीफ फौंडेशन खेड यांचे संकटकाळात तसेच सामाजिक कार्यात फार मोठे योगदान आहे कोरोना संक्रमण काळातही मुकादम हायस्कूल  येथे कोविड संदर्भात प्राथमिक स्तरावर उपाययोजना म्हणून आरोग्य केंद्र  उभारण्यात आले होते यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेत होती यावेळी सुमारे अडीच हजारहुन अधिक पीपीई किट चे वाटप करण्यात आले होते या करिता लाखो रुपयांचा खर्च रिलीफ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला होता तसेच अपंग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या समाजातील घटकांना रिलीफ फाउंडेशनचे नेहमी मदत कार्य असते अपंग व्यक्तींना व्हीलचेअर तसेच मुलांना शैक्षणिक कार्यातही  मोठा मदतीचा हात असतो यामध्ये अनेक मुलांना लॅपटॉप ,  कपडे वाटप हा उपक्रमही मोठ्या प्रमाणात सुरू असतो निसर्ग चक्रीवादळ असो वा टोक्ते वादळ या वादळामध्ये आणि अनेक गरीब व रोजगार  नसलेल्या लोकांची घरे कोसळली या संकट काळातही रीलीफ फाउंडेशनने नुकसानग्रस्त नागरिकांना मोठा मदतीचा हात दिला. कोणाला घराच्या भिंती बांधायला मदत तर कोणाला सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले होते.कोरोना काळातही अनेकांचा रोजगार गेला होता अशा वेळी गरजवंत कुटुंबाना अन्नधान्य वाटप खाद्यपदार्थ वाटप असा उपक्रम राबविण्यात आला होता,शिवाय खेड पोलीसांच्या मागणीवरूनही पोलिसांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले होतें.शिवाय अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलीच्या संपूर्ण लग्नाचा खर्च रिलीफ फौंडेशनने केला आहे. पूरग्रस्त असणाऱ्या ज्या गरजवंत मुलांना नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात जायचे आहे  अशा गरजवंतांचा पासपोर्ट पुरात संपूर्ण खराब झाला असल्यास अशांना नवीन पासपोर्ट काढणे कामी सर्वोतोपरी मदत रिलीफ फौंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे.

*◼️चौकट : महापुरात सर्वात मोठे मदतकार्य*

चिपळूण,खेड,महाड येथे २२जुलै रोजी आलेल्या महापुरात नागरिक आणि व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते सर्वत्र अन्नधान्य वाटप सुरू होते परंतु अशा संकटकाळात या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे राहावे या करिता आर्थिक सहकार्य करणे गरजेचे होते अशा गरजवंत छोट्या-छोट्या दुकानदारांच्या मदतीला धावून येत रिलीफ फाउंडेशन रोख आर्थिक स्वरूपाची मदत केली घरगुती नुकसानि झालेले आणि दुकानदार अशी वर्गवारी करण्यात आली होती. असे एकूण १०० घरांचे नुकसान झालेल्या लोकांना तर १०० दुकानांचे नुकसान झालेल्या लोकांना असे एकूण खेडमध्ये दोनशे जणांना आर्थिक मदतीची वाटर झाले तर पुढील आठवड्यात चिपळूण आणि महाड येथे अशा प्रकारची मदत वाटप केली जाणार आहे अशी माहिती रिलीफ फौंडेशनचे पदाधिकारी सिकंदर जसनाईक सामाजिक कार्यकर्ते खालिद चोगले, हनिफ घनसार यांनी दिली आत्तापर्यंत पूरग्रस्त बांधवांना लाखो रुपये वाटप करण्यात आले आहेत, १५ ऑगस्ट रोजी खेडचे तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याहस्ते १०० जणांना रोख मदत वाटप करण्यात आली.

 रिलीफ फाउंडेशनने केलेल्या या आर्थिक मदतीबाबत पूरग्रस्त कुटुंबांनी समाधान व्यक्त केले असून या मंडळींना आशीर्वाद दिले आहेत.कतार येथील उद्योजक अजीम धनसे यांच्या प्रेरणेने आणि सभापती सिकंदर जसनाईक,सामाजिक कार्यकर्ते खालिद चोगले,हनिफ घनसार  यांच्या विशेष प्रयत्नाने सुरू असलेल्या या मदत कार्याबद्दल सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.समाजउपयोगी या संपूर्ण उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या कोकण डिस्टर मॅनेजमेंट ग्रुप,जामा मशीद ट्रस्ट, कोकणी डॉक्टर असोसिएशन,व्हॉइस ऑफ कोकण,अंजुमन दरदमन या सेवाभावी संस्थांचे रिलीफ फौंडेशन चे सिकंदर जसनाईक,खालिद चोगले, हनिफ घनसार यांनी विशेष आभार मानले आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies