Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

येणारे सण गुण्यागोविंदाने साजरे करा ,कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये राहून सहकार्य करावे - सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमन

 येणारे सण गुण्यागोविंदाने साजरे करा ,कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये  राहून सहकार्य करावे - सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमन

 अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


दिघी सागरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना वैयक्तिक मोबाईल नंबर देत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शांतता बैठकीत परिसरातील विविध मान्यवरांशी संवाद साधतांना म्हणाले की, माझ्या कडून सर्व नागरिकांना सर्व सहकार्य आपल्याला मिळेल यात शंका नाही.मात्र शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांमध्ये येणारा गोविदा व गणपती उत्सव करावे.येणाऱ्या  गोविंदा गोपाळकाला व गणपती उत्सव  या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सलोखा राखत अनावश्यक गर्दी टाळत सण साजरे करण्याचे आवाहनही सहा पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी केले. मास्क व सॅनिटायझर वापरावे. शिवाय गोपाळकाळाच्या सणात रंगाचा बेरंग केल्यास पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा ही दिला. सण-उत्सव पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा, परंतु त्यात धांगडधिंगा नसावा. उत्सव शांततेत कसा पार पडेल याची काळजी घ्यावी.गरज पडल्यास पोलिसांशी संपर्कात राहून पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी  उपस्थित नागरिकांना केले.यावेळी पोलीस उप निरीक्षक कर्मराज गावडे, संदीप चव्हाण, निलेश सोनवणे, महामदभाई मेमन,सुकुमार तोडलेकर  शिस्ते सरपंच चंद्रकांत चाळके, माजी सरपंच रमेश घरत, शंकर गाणेकर,दांडगुरी ग्रा पंचायतीचे माजी सरपंच श्रीपाल कवाडे,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बिराडी,गजानन चाळके,शामकांत भोकरे,शब्बीर फकीर,लक्ष्मण भाये,पोलीस पाटील उद्देश वागजे, दिलीप नाक्ती,पत्रकार व हिंदू- मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढाऱ्यांची मध्यस्थी नको

 अनेकवेळा गुन्हेगारांना वाचवण्यासाठी स्थानिक राजकारणी तसेच पुढारी व कार्यकर्ते पूढे येतात. आशा वेळी पोलिसांना त्यांचं काम स्वतंत्रपणे करू देण्याचे आव्हान सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी यावेळी बोलताना केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies