Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

Kia कडून एमपीव्ही लाँच करण्याची तयारी

 Kia कडून एमपीव्ही लाँच करण्याची तयारी

 ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम


भारतात 7 सीटर कारची मागणी वाढू लागली आहे. सध्या ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा ट्रेंड आहे. परंतू अनेकांना हम दो हमारे दो सह घरातील अन्य सदस्य असल्याने कमी किंमतीतील सात सीटर एमपीव्हीकडे (7 Seater MPV) लोकांचा ओढा आहे. सध्या बाजारात स्वस्तातली रेनॉची ट्रायबर आणि मारुतीची अर्टिगा व एक्सएल6 उपलब्ध आहेत. याचबरोबर ह्युंदाई, टाटा, महिंद्रा आणि एमजी याकंपन्यांच्या थोड्या महागड्या कार देखील आहेत. याला टक्कर देण्यासाठी किया मोटर्सने मोठी तयारी केली आहे.

किया मोटर्सने (Kia Motors) कमी काळात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांत 4 लाख कार विकल्या आहेत. याचा फटका मारुतीच्या ब्रेझाला जास्त बसला आहे. आता किया अर्टिगाला टक्कर देण्य़ासाठी सज्ज होत असून 7 सीटर एमपीव्ही आणण्याच्या तयारीला लागली आहे.

Kia Sonet, Kia Seltos आणि Kia carnival या तीन कार सध्या कियाच्या ताफ्यात आहेत. यापैकी किया सेल्टॉसने तुफान सेल केला आहे. यामुळे पुढील वर्षी सुरुवातीला किया Kia KY ही एमपीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची किंमत ही Maruti Ertiga आणि Toyota Innova Crysta सारख्या कारच्या रेंजमध्ये असू शकते. याची किंमत 14 ते 20 लाख रुपये असू शकते. या कारचे फिचर्स कसे असतील यावर किंमतीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. Kia KY 7 Seater MPV ही कार किया सेल्टॉस म्हणजेच ह्युंदाई क्रेटाच्या प्लॅटफॉर्मवर बनविली जाईल. या कारमधील थर्ड रो हा इलेक्ट्रॉनिक बटनाद्वारे अॅडजस्ट होईल. या एमपीव्हीमध्ये सहा आणि सात सीटर ऑप्शन असेल. कियाच्या या एसयुव्हीमध्ये ह्युंदाईच्या Hyundai Stargazer 7 Seater MPV सारखे फिचर असतील. ह्युंदाईची ही कार पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies