Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जे के सिमेंटने जपले सामाजिक दायित्व पूरग्रस्त भागात गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

 जे के सिमेंटने जपले सामाजिक दायित्व पूरग्रस्त भागात गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

ओंकार रेळेकर-चिपळूण


चिपळुणात २२ जुलै रोजी आलेल्या महाप्रलय कारी पुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला जे के सिमेंट कंपनी धावून आली आहे. चिपळूण मधील जे के सिमेंटच्या विक्रेत्याच्या विशेष पुढाकाराने बुधवारी जे के सिमेंट च्या कोल्हापूर आणि चिपळूण शाखेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाने गृहोपयोगी साहित्याचे वाटप केले.

      पेठमाप ,बुरटे आळी, तांबट आळी, परीठ आळी,मुरादपूर, शंकरवाडी, गोवळकोट, खेर्डी, कुंभारवाडी, वाणी आळी, पवार आळी, दादर मोहल्ला आदी परिसरात गुरुवारी चादर,सतरंजी,चटई इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सागर तलवार एरिया मॅनेजर स्वरूप रेडिज वरिष्ठ अधिकारी मनीष देवगडे खाते व्यवस्थापक अखिलेश नितनवरे .संदेश खामकर ग्राहक सेवा अधिकारी बिंदू चौगले यावेळी आदी उपस्थित होते. इम्पेरियल ट्रेडर्सचे निहाल मालाणी, सुभान अल्लाह ट्रेडर्सचे सरफराज मालाणी, 

 लक्ष्मी मार्बल किसन पटेल,मोहित पटेल, आदित्य ट्रेडर्सचे आनंदा निडुरे यांच्यासह चिपळूण मधील सर्व विक्रेत्यांच्या पुढाकाराने साहित्य वाटप कार्यक्रम जे के सिमेंट कंपनीच्या  वतीने राबविण्यात आला.चिपळूण शहर परिसर आणि खेर्डी मध्ये एकूण ४५० गृह उपयोगी साहित्याचे वाटप झाले.

    जे के सिमेंट च्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे प्राथमिक स्वरूपात भेट देऊन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळुणात उपयोगी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies