Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पत्रकार ,लेखक नाटककार जयंत पवार यांचे निधन जयंत पवार हे

 

पत्रकार ,लेखक, नाटककार जयंत पवार यांचे निधन

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबईसुप्रसिद्ध लेखक नाटककार, पत्रकार, नाट्यसमीक्षक जयंत पवार यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झालं असून साहीत्य जगतातील एक हिरा निखळला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

2014 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.काय वारा सुटलाय या नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत सर्वात्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळालं होतं.

जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला.

'प्रयोग मालाड' या नाट्यसंस्थेने १३-१४ ऑक्टोबर २०१८ या दिवसांत 'लेखक एक, नाट्यछटा अनेक' या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या १४ एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. 

जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके

 • अधांतर
 • काय डेंजर वारा सुटलाय
 • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
 • दरवेशी (एकांकिका)
 • पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
 • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
 • बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
 • माझे घर
 • वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
 • वंश
 • शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
 • होड्या (एकांकिका)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies