Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; अखेर पोलीस पाटील निलंबित

 इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; अखेर पोलीस पाटील निलंबित

सतीश पवार- इंदापूर 

इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील पोलिस पाटलाने राजकारणात भाग घेतल्याबद्दल घोरपडवाडी येथील गजानन लंबाते आणि इतरांनी 22 जानेवारी 2क्स019 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती , तर दोन ऑगस्ट रोजी अमोल कांबळे यांनी आत्मदहन करू असा इशारा दिला होता . त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी घोरपडवाडी पोलीस पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट केले . घोरपडवाडी येथील पोलीस पाटला निलंबित करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे घोरपडवाडी तील ग्रामस्थांनी अर्ज केले होते , मात्र आमच्या अर्जाची दखल घेतली जात नसल्याने दोन ऑगस्ट रोजी आम्ही आत्मदहन करू असा इशारा अमोल तुकाराम कांबळे आणि इतरांनी दिला होता . त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करत घोरपडवाडीच्या पोलिस पाटलांचे निलंबन झाले असल्याचे स्पष्ट केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies