शांतीदुत परिवारातर्फे आदिवासी गोरगरिब नागरिकांना अखंडीत मोफत आरोग्य सेवा,
अरुण जंगम-म्हसळा
आदिवासी पाड्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात व या लोकांना किमान वाचण्याइतके शिक्षण मिळावे याकरिता शांतीदुत परिवार कायम झटत असुन याचा प्रत्यय रविवारी दिनांक 1/8/2021रोजी आला.शांतीदुत परिवाराच्या अध्यक्षा ह्या मा.विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कन्या असुन मागील अनेक वर्षापासुन आदिवासी बहुमोल समाजाच्या विकासासाठी झटत आहे..
हा आदिवासी समाज दुरवर डोंगर कपारीत वास्तव करित असुन ह्या समाजामध्ये आजही पारंपारिक रुढी चालत आल्या आहेत.शिक्षणापासुन कायमच लांब असलेल्या या समाजाकरिता काही करता यावे ह्या करिता शांतीदुत परिवार कायम झटत असल्याचे शांतीदुत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा तृषालीताई जाधव यांनी माहीती देताना प्रतिपादन केले.
माणसाशी व निसर्गाशी नाते जपणारा परिवार म्हणजे शांतीदूत परिवार. आदिवासी भागातील गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शांतिदूत परिवारच्या राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव व म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अलंकार करंबे व डॉ. सोनाली करंबे यांच्या संयुक्तिकरिते दि.01.08.2021 0रोजी आदिवासी वाडी कोळे येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव सुर्वे,पोलीस निरिक्षक म्हसळा पोलीस स्टेशन, देवकाताई जाधव सरपंच कोळे ग्रामपंचायत,सन्माननीय पत्रकार बांधव अरुण जंगम व बाबू शिर्के आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमच्या अखेर मनोगतद्वारे म्हसळा ग्रामीण रूग्णालय व त्यांचे सरकारी डॉक्टर व नर्सेस टीम यांचे या सेवाभावी कार्यात दिलेला सहभाग व आदिवासी आरोग्य शिबिर यशस्वीरिते पार पडण्यास अनमोल सहकार्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
राजभवन मुंबई येथे रविवारी (दि. २७जून 2021) आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती राज्य पुरस्कार देण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुणवंत महिलां म्हणून तृषालीताई जाधव यांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तृषालीताई जाधव या शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पुणे जिल्हा, चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या चिटणीस देखील आहेत.