Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पूरग्रस्तांना मदतकार्यात मुस्लिम संमाजसंघटनाचा मोठा सहभाग

 पूरग्रस्तांना मदतकार्यात मुस्लिम संमाजसंघटनाचा मोठा सहभाग

सुमारे दहा हजारहून अधिक लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचे जामा मशीद अहले हदीस चिपळूणचे उत्कृष्ट नियोजन 

ओंकार रेळेकर-चिपळूण


चिपळूण मध्ये २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला कोकणातील मुस्लिम समाज संघटना धावून  आली आहे.सुमारे दहा हजारहून अधिक लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचे जामा मशीद अहले हदीस चिपळूणचे पदाधिकारी यांचे  उत्कृष्ट नियोजन राहिले आहे.चिपळूण,खेड,महाड मधील संपूर्ण पुरबाधित क्षेत्रात विविध मुस्लिम संघटना कडून आलेल्या मदतीचे  जामा मशीद अहले हदीस गोवळकोट रोड मशीद येथून वाटप करण्यात आले.

          रोशनी एज्युकेशनल वेल्फेअर ट्रस्ट,  सुबये जमियते अहले हद्दीस मुंबई, इदारा दावतुल कुराण सुन्ना,मिल्लतनगर गोवळकोट रोड चिपळूण चिपळूण या स्वयंसेवी संस्थांतर्फे चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील १० हजार पूरग्रस्त व दरडग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह गृहपयोगी वस्तू, औषधे आदी साहित्यांचे वाटप करून या सर्वांना दिलासा दिला आहे. या संस्थांच्या भरघोस मदतीने पूरग्रस्त व दरडग्रस्त भारावून गेले आहेत. तरी या सर्वांनी या संस्थांच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तरी या संस्थांतर्फे गरीब व गरजू पूरग्रस्तांच्या पुनर्वसन अथवा घर दुरुस्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती  जामा मशिद अहले हदीस चिपळूणचे उपाध्यक्ष यासीन दळवी यांनी बोलताना दिली. 

  गेल्या २५ दिवसांपूर्वी अतिवृष्टी व महापुरामुळे चिपळूणवासियांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्था दानशूरांनी पूरग्रस्तांना मदतीचा सहकार्याचा हात दिल्याने दिलासा मिळण्यास मदत झाली. यामध्ये रोशनी एज्युकेशनल वेल्फेअर ट्रस्ट तसेच सुबये जमियते अहले हद्दीस मुंबई, इदारा दावतुल कुरआन सुन्ना चिपळूण या संस्थांनी देखील पूरग्रस्त व दरडग्रस्तांना भरघोस मदतीचा हात दिला आहे. या संस्थांतर्फे मजरेकाशी, गोवळकोट, गोवळकोट, भोईवाडी, बौद्धवाडी, गोवळकोटरोड, पेठमाप मराठीआळी, जाडेआळी, तरेवाडी, खाटीक गल्ली,  बावशेवाडी, चिपळूणकरवाडी, वाणी आळी, मुरादपुर, शंकरवाडी, बेबल मोहल्ला, दादर मोहल्ला, मार्कंडी, काविळतळी, बहादूरशेखनाका, खेर्डी माळेवाडी, मिरजोळी, जुवाड बेट, गुहागरनाका, बाजार परिसर, कळंबस्ते,  पेठमाप बुरटे आळी, साईनाथ आळी, रामोशीवाडी तसेच ग्रामीण भागातील कादवड, मुसाड, दळवटणे,  निरबाडे, पोसरे दत्तवाडी, कळंबस्ते भाग शाळा परिसर तसेच संगमेश्वर कसबा येथील पूरग्रस्त व दरडग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. तसेच संगमेश्वर उक्षी येथे दरड कोसळण्याची घटना घडली होती. येथील १७ दरडग्रस्तांना देखील मदत देण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह ब्लॅंकेट, चादर, भांडी आदी साहित्यांचा देखील समावेश होता. या संस्थांतर्फे सुमारे १० हजार पूरग्रस्तांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. या संस्थांनी  एक प्रकारे पूरग्रस्तांना सहकार्याचा, मदतीचा हात दिला आहे.  या किटच्या वाटपाचे नियोजन 'मिलत नगर' जामा मस्जिद अहले हदीस गोवळकोटरोड येथून करण्यात आले. पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन या वस्तूंचे वाटप करण्यात आले.  यामुळे पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सुमारे १० हजार पाणी बॉटलचे देखील वितरण करण्यात आले. इतक्यावरच या संस्था थांबल्या नाहीत तर  पूर ओसरल्यानंतर सर्वत्र गाळ व चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती.  त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे पूर ओसल्यानंतर  कोकणी मुस्लिम डॉक्टर्स असोशिएनच्या सहकार्याने पूर ओसरल्यानंतर ३ ते ४ दिवस सहारा वेल्फेअर सोसायटीची मोबाईल रुग्णवाहिकेद्वारे १३०० पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तर १३ ते २७ ऑगस्टपर्यंत मोफत आरोग्य तपासणी,  रुग्णांना मोफत औषधे ही सेवा सुरू आहे. तरी चिपळूणवासियांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही सेवा मिलत नगर गोवळकोट रोड जामा मस्जिद अहले अद्दीस येथे सुरू आहे, अशी माहिती अध्यक्ष यासीन दळवी यांनी दिली.महाड येथील पूरग्रस्तांना देखील भरघोस मदत देण्यात आली.  चिपळुणातील गरजू व गरीब पूरग्रस्त, दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यासिन दळवी यांनी दिली आहे.रोशनी फाउंडेशनचे अध्यक्ष मुनावर पठाण, ट्रस्टी यासीन दळवी, अब्दुल हक खलपे मकसूद सेन, अबीद खावर, अब्दुल रउफ खोत यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत. जामा मशिद अहले हदीस चिपळूणचे अध्यक्ष इसाक अष्टीकर उपाध्यक्ष ईदारा दाउतूल  कुराण, जनरल सेक्रेटरी इब्राहिम सरगुरोह,सदस्य अख्तर मुकादम अशपाक नाखुदा, अजिज परकार,इक्बाल केसरकर आदींनी या सर्व मदत कार्यात अहोरात्र मेहनत घेऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त च्या घरोघरी मदत पोहोचण्यासाठी परिश्रम घेतले. तांदूळ ,पीठ, साखर ,डाळ ,तेल ,चादर ,कपडे  ,भांडी, गॅस शेगडी ,गाद्या मेडिकल किट ,साबण, कपडे, सॅनिटरी ॲटम ,बुरमुस यासह असंख्य गृहोपयोगी वस्तू या कीट मध्ये देण्यात आल्या होत्या.पूर आल्याच्या सुरुवातीच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती अशा वेळी यासिन दळवी आणि त्यांच्या सहकारी मंडळींनी प्रत्तेक ठिकाणी जनरेटरद्वारे चार संचावरून पाण्याचे पंप सुरू करून अपारमेंट मध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जनरेटर द्वारे चढविले यातून नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर झाली.सतत पंधरा दिवस सुरू असलेल्या या मदत कार्यामधून सुमारे दहा हजार लिटर पाणी आणि दहा हजारहून अधिक गृहउपयोगी वस्तूचे किट लोकांना पोच करण्यात आले. सहारा एज्युकेशन ट्रस्ट आणि कोकण मुस्लिम असोसिएशन यांच्या सहकार्याने पाणी ओसरल्यानंतर तीन ते चार दिवस ॲम्बुलन्स मधून नागरिकांची तपासणी होत होती. यातून सुमारे तेराशे रुग्णांची तपासणी पूर्ण झाली कोकणी मुस्लिम डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन चे डॉक्टरांचे पथक चिपळूण साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष लक्ष देऊन स्वतः प्राथमिक तपासणी करत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies