Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मदत नव्हे सेवा सदानंद चव्हाण आणि कुटुंबीय स्वतः उतरले आहेत सेवाकार्यात

 मदत नव्हे सेवा सदानंद चव्हाण आणि कुटुंबीय स्वतः उतरले आहेत सेवाकार्यात

माजी आमदार सदानंदजी चव्हाण यांचे संपूर्ण कुटूंब पूरग्रस्तांसाठी अहोरात्र कर्तव्यावर

ओंकार रेळेकर-चिपळूण


मदत नव्हे तर सेवा असे मानून चिपळूणचे मा.आ.सदानंद चव्हाण आणि संपूर्ण कुटुंबीय पूरग्रस्त बांधवांच्या सेवा कार्यात उतरली आहेत.मदत नव्हे तर सेवा असे मानून आ.सदानंद चव्हाण समोर येईल ते कार्य हाती घेऊन थेट घरोघरी पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचत आहेत.

         महापुराचा मोठा फटका शहरातील आणि ग्रामीण भागातील व्यापारी आणि नागरिकांना बसला आहे.अनेक भागात कुटुंब उध्वस्त झाली आहेत,काहींची घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे सर्वच साहित्य पडझड सोबत वाहून गेले आहे भांड्यांपासून ते कपड्यांपर्यंत  साहित्य नव्याने या लोकांना उभे करावे लागत आहे अशा काळात शिवसेना पक्ष सर्वत्र मदतीला धावून आला आहे.२२ जुलै रोजी चिपळुणात आलेल्या महाभयंकर पुराच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना शिवसेना पक्षाच्या वतीने धान्य, कपडे, भांडी, औषधे, मुलांचा खाऊ, चादर, ब्लॅंकेटस, चटई, महिलांसाठी कपडे व अन्य औषधे, आवश्यक तेथे गॅस शेगडी, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंचे किट करून ते पूरबाधित कुटुंबांपर्यंत घरोघरी पोहोच करण्याचे नियोजन व मदत केंद्र खासदार विनायक राऊत , माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिनजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेर्डी-चिपळूण येथे पुष्कर कॉम्प्लेक्स बिल्डींगमध्ये अविरतपणे सुरू आहे. 

या कर्तव्यठिकाणी स्वतः सदानंद चव्हाण  अहोरात्र मेहनत घेत आहेत.ते येथे फक्त मार्गदर्शनच न करता काम करणारे कार्यकर्ते यांना कामे समजावत असताना ते स्वतः साहित्य बांधणेच्या कामापासून ते अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणी बसून ते स्वतः काम करत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ते मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून मदत वितरणाचे व्यवस्थित नियोजन करून त्याप्रमाणे काम होत आहे. 

त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सीमा चव्हाण या सुद्धा या ठिकाणी दिवस-रात्र सेवाकार्य करीत आहेत. काही महिला- भगिनींचे ग्रुप घेऊन महिलांचे कपडे व अन्य औषधे असे किट तयार करून देत प्रत्यक्ष गरज आहे तिथे महिलांसाठीची मदत पोच करीत आहेत. तसेच मुलगा पुष्कर हा युवा सेनेतील मित्रांना सोबत घेऊन सर्व कामगिरी पार पाडत असतानाच पूरग्रस्त भागात फिरून पाणी, जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. दोन्ही मुली डॉ. शरयू व साक्षी या देखील औषधे विभागणी करून ते मार्किंग करणे व त्यांचे स्वतंत्र किट बनवून त्यामध्ये औषधांची माहिती लिहून टाकणे ही जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडत आहेत. 

यांचेसह दोन्ही पुतणे किशोर व केतन हे तर चोवीस तास या ठिकाणी अथक परिश्रम घेत आहेत. साहित्य चढविणे- उतरविणे च्या कामापासून अगदी कोणत्याही कामात हे दोघेही अग्रेसर राहत आहेत. 

ही सर्वच मंडळी ज्या पद्धतीने जीव ओतून पहिल्या दिवसापासून कर्तव्यात आहेत. ही आमची मदत नसून ते आमचे कर्तव्यच आहे, या भावनेने हे संपूर्ण कुटुंबीय या मदत कार्यात दिवसरात्र व्यस्त आहेत. ही मदत सर्व शेवटच्या कुटुंबांपर्यंत सन्मानपूर्वक सुपूर्द करण्याचा जणू चंगच या चव्हाण कुटुंबाने बांधलेला या त्यांच्या देहबोलीतुन प्रत्येक क्षणाला दिसून येत आहे. 

त्याचबरोबर येथे कर्तव्य म्हणून मेहनत करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आप-आपले मोलाचे योगदान देत आहेत.तमाम शिवसैनिकांचे 

दैवत स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून आमदार सदानंद चव्हाण आपल्या कुटुंबीयांसोबत स्वतः थेट मदत कार्यात उतरले आहेत वेळ प्रसंगी ते पूरग्रस्तांसाठी सामान ट्रक मध्ये चढविणे उतरवणे आणि वेळेत पुरबाधित नागरिकांपर्यंत पोहचविणे  हेही काम ते एक सेवाच म्हणून न संकोच बाळगता  करीत आहेत.

  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies