Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आमदार अजय चौधरी यांची पूरग्रस्तांना भरीव मदत.

 आमदार अजय चौधरी यांची पूरग्रस्तांना भरीव मदत.

अमोल चांदोरकर -श्रीवर्धन



 शिवसेना मुंबई, शिवडी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार यांच्यातर्फे

महाड तालुका व सातारा तालुका  येथील पूरग्रस्त गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून भरीव मदत करण्यात आली आहे.

नागरीकांना मदत करत असतानाच मुक्या जनावरांना देखील १००० किलो पेंढ नेत आमदार अजय चौधरी यांचे मुक्या प्राण्यांबद्दलची आपुलकी देखील दिसली. विशेष म्हणजे स्वत: हा अजय चौधरी महाड व सातारा येथे दोन दिवस मदत देण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सिद्धेश अजय चौधरी यांना स्वत:हा उपस्थित राहत शक्य तितकी मदत गरजूंपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. केलेल्या मदतीमध्ये १००० ब्लॅंकेट,  १०० साड्या, ५०० चादर , ५०० चटई, १००  , तेल-५०० बॅाटल, शर्ट-५००, महिलांसाठी व मुलींना ड्रेस-५००

१०० बॅाक्स पाणी बॅाटल, ५० लीटर दूध,  मेणबत्ती ७० पॅकेट, माचिस बॅाक्स १५, मच्छर अगरबत्ती १८० पॅकेट, साबण-५००, कोलगेट-१५०, सर्फ एक्सेल व व्हीव बार- ४२०, पार्लेजी- ५००, 

पशु खाद्य- १०० किलो. व अन्य जिवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आल्याचे युवानेते सिद्धेश अजय चौधरी यांनी सांगितले.

यावेळी युवानेते अनिकेत घोसाळकर यांच्यासह शिवसेना शिवडी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पदांधिकारी, युवा सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies