Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत येथे बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या उभयतांना अटक

कर्जत येथे बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या उभयतांना अटक

          नरेश कोळंबे-कर्जत

कर्जत तालुक्यातील छोटे वेणगाव परिसरात राहणाऱ्या पती पत्नीला रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून तब्बल  ३ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ह्या करण्यात आलेल्या धडाकेबाज कारवाईची सर्वच स्तरांतून स्तुती होत असून कर्जत परिसरात होत असलेल्या ह्या गांजा विक्रीच्या कामा बद्दल आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

 छोटे वेणगाव येथे राहणारे गणपत भागा वाडेकर आणि त्यांची पत्नी उज्ज्वला गणपत वाडेकर हे दोघे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची बातमी कर्जत पोलिसांना लागली होती . ह्या गोपनीय माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्याची माहिती पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी खालापुर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष शुक्ला यांना दिली त्यांनतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी  त्या अनुषंगाने सर्व काळजी घेत राहत्या घरी धाड टाकली असता या उभयतां कडे २० किलो ६०० ग्राम वजनाचा गांजा सापडला असून त्याची किंमत तब्बल ३ , २९,६०० रुपये एवढी असल्याचे समजते .  हा लपवून ठेवलेला गांजा सापडला असल्याने ह्या उभयतांवर अमली पदार्थ बाळगल्या बद्दल एन डी.पी एस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजू आल्हट हे करत आहेत. सदर महिला व इसम ह्या दोघांना चौकशी करता ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्या नंतर त्यांनी हा गांजा संगमनेर येथील मुख्तार शेख यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्तार शेख यांच्या घरी चौकशी करता पोलीस गेले असता त्यांना सदर आरोपी फरार असल्याचे समजले. सदर गुन्ह्यामध्ये सापडलेला गांजा हा ३,२९.६०० रू आणि वापरलेली चारचाकी रू ४०००० किमतीची या प्रमाणे एकंदरीत रू. ३,६९००० एवढा मुद्देमाल जप्त केला आहे. 

     सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला , पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, सपोनी राजू आल्हाट,पोहवा. सुभाष पाटील, मपोना दीपा खडे,पोशी भूषण  चौधरी, पोशि गणेश पाटील, पोशि अश्रुबा बेंद्रे ह्यांनी केली असून पुढील तपास चालू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies