Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

टेस्लाला टक्कर देणार मेड इन इंडिया Electric Car ! सिंगल चार्जमध्ये 500KM रेंज; कधी होणार लाँच?

 टेस्लाला टक्कर देणार मेड इन इंडिया Electric Car ! सिंगल चार्जमध्ये 500KM रेंज; कधी होणार लाँच?

 टेक विश्व

अनुप ढम

भारतात गेल्या काही कालावधीपासून सतत नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत, ऑडी,बीएमडब्लू सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केल्यात. तर, आगामी काळात जगातील दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (Tesla) देखील भारतात एंट्री करणार आहे. तुम्हाला वाचून कदाचीत आश्चर्य वाटेल पण टेस्लाला टक्कर देण्यासाठी एका भारतीय कंपनीने कंबर कसली आहे.

बँगलोर स्थित Pravaig Dynamics भारतामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Pravaig Extinction MK1 ही कार लाँच करणार असून ही दमदार ड्रायव्हिंग रेंजसह येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किमीपर्यंत शानदार रेंज देण्यास सक्षम असेल. जर या कारची अन्य अन्य प्रीमियम इलेक्ट्रिक कारसोबत तुलना करायची झाल्यास फोक्सवॅगन ID.3 साधारणपणे ५०० किलोमीटरची रेंज देते, टेस्ला मॉडल-3 सिंगल चार्जमध्ये ५०७ किलोमीटरची रेंज देते. भारतात सध्या विक्री होत असलेल्या हाय रेंज इलेक्ट्रिक कारशी तुलना करायची झाल्यास ह्युंडाई कोना ईव्ही ४५२ किलोमीटर, एमजी झेडएस ईव्ही ३४० किलोमीटर आणि मर्सिडीज EQC ची रेंज फक्त ३५० किलोमीटर इतकी आहे.

 

Extinction MK1 ला ८० टक्के चार्ज करण्यासाठी फक्त ३० मिनिटांचा वेळ लागेल. या कारमध्ये 96 kHw ची बॅटरी देण्यात येईल, जी 200 hp मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. याद्वारे 196kmph इतका या कारचा मॅक्सिमम स्पीड असेल, तर ० ते १०० kmph वेग पकडण्यास फक्त ५.४ सेकंदाचा वेळ लागेल

या कारमध्ये चांगल्या एअर क्वालिटीसाठी 10x सीओ2 रिडक्शन आणि एक शक्तिशाली PM2.5 फिल्टर दिले जाईल. तसेच कारमध्ये १५ इंचाचा लॅपटॉप ठेवण्यासाठी एक डेस्क, पॉवर पोर्ट्स आणि 2 USB थंडरबोल्ट पोर्ट्स मिळतील. २०२२ मध्ये ही कार लाँच होईल, पण पहिल्या टप्प्यात ही कार टॅक्सीच्या रुपात विक्रीसाठी उपलब्ध असेल तर दुसऱ्या टप्प्यात खासगी ग्राहकांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies