राज्य फुलपाखरू निलवंती यांचे आगमन
मिलींदा पवार -खटाव
मायणी येथे मागच्या वर्षी राज्य फुलपाखरू निलवंती यांचे आगमन झाले होते तसेच मायणी हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या वृक्षसंवर्धन व वन विभागात असलेल्या ब्रिटिश कालीन तलावात परदेशी पाहुणे फ्लेमिंगोचे आगमन होत असते परंतु यावर्षी जेड हॉकमोथ या दुर्मिळ फुलपाखराचे आगमन झाले असून गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
जेड हॉकमोथ फुलपाखराचा पंखाचा विस्तार८०-१२० मिमी आहे.एक अतिशय वेगवान उड्डाण करणारे आहे आणि गोड वास घेणारे फुले आणि प्रकाश दोन्हीकडे आकर्षित होते त्याचे डोके आणि कॉलर जांभळ्या, तपकीरी रंगाचे आहे छाती आणि पहिल्या दोन ओटीपोटाचे विभाग हिरवे आहेत ज्यामध्ये पहिल्या भागाला फ्रिंज आहे इतर उदरपोकळी चे भाग पिवळे हिरवे आहेत. हे दुर्मिळ फुलपाखरू श्रीलंका, दक्षिण आणि उत्तर भारत, नेपाळ म्यानमार, दक्षिण चीन, थायलंड मलेशिया, इंडोनेशिया या ठिकाणी पाहायला मिळते
सध्या मायणी येथे पर्यावरण व निसर्गप्रेमी फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव व ग्रामपंचायत सदस्य जाधव यांच्या घरी मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट पासून मुक्कामी असून त्याचा पाहण्यासाठी व त्याचे फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत